Office Yoga esakal
आरोग्य

Office Yoga : एकाच जागी बसल्याने अंग आखडलं? शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी हे आसन करा...

अशावेळी काही साधे व्यायाम प्रकार केल्याने आपण लवचिकता वाढू शकते.

सकाळ डिजिटल टीम

मनाली देव

Office Yoga Ekpad Shirsasan : हल्लीच्या धावपळीच्या काळात, बिझी शेड्युलमध्ये व्यायामासाठी वेळ काढणे कठीण असते. पण त्यामुळे आपलं शरीर आखडतं. कारण संपूर्ण शरीराला योग्य व्यायाम न मिळाल्याने लवचिकता कमी होते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात. अशावेळी काही साधे व्यायाम प्रकार केल्याने आपण लवचिकता वाढू शकते.

एकपाद शिरासन

हे बैठक स्थितीमधील आसन आहे. योग्य सरावाने छान जमू लागते.

असे करावे आसन

  • प्रथम दोन्ही हात सरळ करून ताठ बसावे.

  • त्यानंतर हाताच्या मदतीने एका पायाचे पाऊल पकडून पाय थोडासा गुडघ्यात वाकवावा.

  • तोच पाय हळू हळू डोक्याच्या दिशेला न्यावा.

  • डोक्याच्या वरच्या दिशेला पाय गेला की सावकाश मानेपर्यंत घेऊन थोडासा पाठीकडे ओढून घ्यावा.

  • आता दुसऱ्या पायाची मांडी घालावी. दोन्ही हातांचा नमस्कार करावा.

  • नजर स्थिर व श्वसन संथ सुरू ठेवावे. आसन सावकाश उलट क्रमाने सोडावे व दुसऱ्या पायानेही करावे.

आसनाचे फायदे

  • या आसनाच्या नियमित सरावाने मांडीचे स्नायू व शिरा उत्तम ताणल्या जातात. त्यांची लवचिकता वाढते व सशक्त होतात. रक्ताभिसरण सुधारते. कार्यक्षमता वाढते.

  • हे आसन मानपाठीसाठी आणि स्ट्रेचिंगसाठी उपयुक्त आहे.

  • थोडे अवघड असल्याने योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंझ! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT