Oils and fats sakal
आरोग्य

तेले आणि स्निग्ध पदार्थ

सकाळ वृत्तसेवा

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

स्निग्ध पदार्थ आणि तेले हा आपल्या आहाराचा एक आवश्यक भाग आहे. यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते, ऊर्जा मिळते व आपल्या जेवणातील पदार्थ चवदार बनण्यास मदत होते. आपण निरनिराळी तेले व स्निग्ध पदार्थ, त्यांचे फायदे, त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम व स्वयंपाकातील उपयोग याबद्दल जाणून घेऊ.

लोणी (बटर)

पोषण गुणवत्ता : लोण्यामध्ये भरपूर सॅच्युरेटेड फॅट्स (संतृप्त चरबी) असून, जीवनसत्त्व अ, ड, ई व के आणि संयुग्मित लिनोलिक ॲसिड असते.

आरोग्यावरील परिणाम : योग्य प्रमाणात खाल्ल्यास लोणी आपल्या शरीरास जीवनसत्त्वांचे शोषण करून ऊर्जा पुरवण्यास मदत करते. परंतु, जास्त सॅच्युरेटेड फॅट्समुळे जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यास हृदयविकाराचा धोका संभवतो.

तूप

पोषण गुणवत्ता : तुपामध्ये ब्युटिरेट, जीवनसत्त्व अ, ड, ई व के आणि मिडियम-चेन फॅटी ॲसिड्स असतात.

आरोग्यावरील परिणाम : तूप हे पचनास मदत करणारे व सूज कमी करणारे म्हणून ओळखले जाते. जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यास मात्र कोलेस्टेराॅलचे प्रमाण वाढू शकते.

प्राणिज्य चरबी (लार्ड, टॅलो)

पोषण गुणवत्ता : या चरबीत जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, कोलेस्टेराॅल व चरबी विद्रव्य (चरबीत विरघळणारे-फॅट सोल्युबल) जीवनसत्त्वे असतात.

आरोग्यावरील परिणाम : पदार्थाची चव वाढवून ऊर्जा वाढवू शकतात परंतु जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यास हृदयविकार होण्यात भर पडते.

सुक्या मेव्याची तेले (बदाम, अक्रोड)

पोषण गुणवत्ता : ही तेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स व ॲन्टिऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात.

आरोग्यावरील परिणाम : ही तेले हृदयाच्या आरोग्यासाठी साह्य करतात, सूज कमी करतात आणि आवश्यक फॅटी ॲसिड्स पुरवतात; परंतु जास्त प्रमाण कॅलरीज

वाढवते.

बियांची तेले (सूर्यफूल, तीळ)

पोषण गुणवत्ता : पाॅलिअनसॅच्युरेटेड फॅट्स, ई जीवनसत्त्व आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड्सनी युक्त असतात.

आरोग्यावरील परिणाम : सूज कमी करण्यासाठी व पेशींच्या कार्यासाठी आवश्यक असतात; परंतु ओमेगा-३ च्या सेवनाशी असमतोल झाल्यास सूज येण्याचा संभव असतो.

कोंडा आणि वनस्पती तेले (राईस ब्रॅन, ऑलिव्ह)

पोषण गुणवत्ता : या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, फायटोस्टेराॅल्स व ॲन्टिऑक्सिडंट्स असतात.

आरोग्यावरील परिणाम : हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात व कोलेस्टेराॅलची मात्रा कमी करू शकतात. जास्त प्रमाणातील सेवन कॅलरीज वाढवू शकतात.

हायड्रोजनयुक्त स्निग्ध पदार्थ (मार्गारिन, शाॅर्टनिंग)

पोषण गुणवत्ता : यामध्ये ट्रान्सफॅट्स आणि काही प्रमाणात हायड्रोजनयुक्त तेले असतात.

आरोग्यावरील परिणाम : हृदयविकाराचा धोका वाढवते. सूज येणे; तसेच इन्सुलिन प्रतिकार यासारखे धोके संभवतात. स्निग्ध पदार्थ आणि तेलाची शरीरातील भूमिका, आरोग्यावरील परिणाम आदी गोष्टींबाबत पुढील भागात माहिती घेऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT