Omicron updates sakal media
आरोग्य

Omicron: ओमिक्रॉन व्हेरीयंट ठरतोय घातक; असे करा स्वतःचे संरक्षण

Omicron Updates: ओमिक्रॉन व्हेरीयंट (omicron Variant) जीवघेणा नाही अशी चर्चा होत होती, मात्र अलीकडे विविध देशांतील रुग्णांचा ओमिक्रॉनमुळे (Death due to Omicron) मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नवीन प्रकाराने (New Varient of Corona) पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली आहे. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ जगातील इतर देशातही ओमिक्रॉनची नवी प्रकरणे समोर आली. भारतातही ओमिक्रॉनचे 269 रुग्ण सापडले आहेत. ओमिक्रॉन व्हेरीयंट जीवघेणा नाही अशी चर्चा होत होती. परंतु ब्रिटनमध्ये (Britain)१२ तर अमेरिकेतील (America) एका रुग्णापाठोपाठ आता इस्राइलमध्येही (Israel)एका रुग्णाचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू (Death due to Omicron) झाल्याचं समोर आलंय. आणि त्यामुळेच कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर ओमिक्रॉन तिसर्‍या लाटेचे कारण बनू शकतो, असं बोललं जातंय..

ओमिक्रॉन काय आहे? (What is Omicron?)

ओमिक्रॉन विषाणू (Omicron virus) हे कोविड-19 (Covid-19) चे नवीन रूप आहे. WHO ने व्हायरस ऑफ कन्सर्न (Virus of Concern- VOC) या श्रेणीमध्ये त्याचा समावेश केला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हा डेल्टा व्हायरसपेक्षाही (Delta Virus) अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. त्याची पसरण्याची क्षमता कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा ७ पट जास्त आहे. त्यामुळे तो लोकांना वेगाने पसरू शकतो. ओमिक्रॉनचा संसर्ग SARS-CoV-2 पेक्षा खूपच कमी आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या रोगाची तीव्रता कमी झाल्याचे यावरून दिसून येते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण सावधगिरी बाळगू नये

प्रतिकारशक्ती (Immunity) विकसित करते. लस घेतल्याने तुम्ही या विषाणूचे बळी ओमिक्रॉनची लक्षणे (Symptoms of Omicron)-

या विषाणूची लक्षणे कोरोना सारखीच आहेत. डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे, श्वास लागणे, ताप, वास कमी होणे, जेवणाची चव कमी होणे, थकवा आणि अशक्तपणा ही लक्षणे आहेत. या आजारापासून बचाव करण्यासाठी, अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. आरटीपीसीआर चाचणी RTPCR TEST करून या प्रकाराची चाचणी केली जाऊ शकते.

ओमिक्रॉन पासून संरक्षण (Protection from Omicron)-

काही लोकांना असे वाटतंय की, ते लसीचे दोन्ही डोस (Both doses of the vaccine) घेऊन ओमिक्रॉनपासून पूर्णपणे सुरक्षित आहेत. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर एक लक्षात घ्यायला हवं की, या आजाराशी लढण्यासाठी लस तुमच्यामध्ये ठरणार नाही, ही गैरसमज मनातून काढून टाकायला हवा. म्हणून ओमिक्रॉन पासून संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सतर्क रहा.

ओमिक्रॉनचे संक्रमण टाळण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या (Some ways to protect from Omicron)-

1. सामाजिक अंतराचे नियम पाळा. (Follow the rules of Social Distance)

2. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. (Avoid crowded places)

3. मास्कचा वापर करा. (Use Mask)

4 वेळोवेळी आपले हात धुत रहा किंवा स्वच्छ करत रहा.

5. बाहेरून आणलेला कोणताही माल धुतल्यानंतर किंवा स्वच्छ केल्यानंतरच वापरा. (Clean the things brought from outside)

6. तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसल्यास विलग व्हा आणि ताबडतोब वैद्यकीय तपासणी करा. (Notice any symptoms then isolate yourself and get medical treatment)

ओमिक्रॉनमुळे लोकांच्या हृदयात कोरोना महामारीच्या कटू आठवणी पुन्हा जागृत झाल्या आहेत. तथापि, आज आपण या विषाणूशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयार आहोत. पण तरीही तुमचा आरोग्य विमादेखील (Health insurance) ओमिक्रॉनविरुद्ध एक ढाल ठरू शकतो. ओमिक्रॉन वैद्यकीय आणीबाणी तुमच्या चिंतेचे कारण बनण्यापूर्वी तुमचा आरोग्य विमा त्वरित अपडेट करा. कारण रुग्णालयात उपचार (Hospital treatment) आणि औषधांचा खर्च (The cost of Medicines) खूप जास्त आहे. आता बहुतांश विमा कंपन्या कोरोना कव्हरची (Corona cover) सुविधा देत आहेत. जर तुम्हाला अद्याप या प्रकारचा आरोग्य विमा मिळाला नसेल, तर आजच कोरोना आणि ओमिक्रॉनचा आरोग्य विमा मिळवा. तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा पॉलिसी असल्यास, ती अपडेट करायला विसरू नका. (Update Health Insurance Policy)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT