Home Remedies For Oral Health : आजकालची व्यस्त लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी यातल्या चुका या ओरल हेल्थसाठी हानीकारक ठरतात. त्यामुळे दात दुखी, किडने, हिरड्यांच्या समस्या निर्माण होतात. ओरल हायजीन दातांच्या सौंदर्यासाठी नसून त्याच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ओरल हेल्थ फक्त चांगल्या प्रकारे ब्रश करण्यावर अवलंबून नाही.
दातांना आरोग्यपूर्ण बनवण्यासाठी काही घरगुती उपाय करणे आवश्यक आहे. पण जर आधीच दातांमध्ये काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ओरल हेल्थसाठी घरगुती उपाय
मीठाचे पाणी - मीठ असलेले अँटी बँक्टोरियल गुण तोंडातले बॅक्टेरीया साफ करतात. यामुळे तोंडाची दुर्गंधी जाते. यासाठी एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात अर्धा चमचा मीठ टाका. या पाण्याने दिवसभरात ४ वेळा चूळ भरा.
खोबरेल तेल - ओरल हेल्थचा विषय आला की, ऑइल पुलींगचं नाव नक्की घेतलं जातं. ऑइल पुलिंगसाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकतात. यासाठी तोंडात एक चमचा खोबरेल तेल घेऊन ते साधारण १० ते १५ मिनीट तोंडात घोळत रहा, त्यानंतर चूळ भरून पेस्ट लावून ब्रश करा.
मोहरीचे तेल - अर्धा चमचा हळदीत काही थेंब मोहरीचे तेल टाकून त्यांची घट्ट पेस्ट बनवा. या पेस्टने दात आणि हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे दात साफ आणि मजबूत बनतील.
तुळस - मोहरीचे तेल आणि तुळशीची पाने एकत्र करून ब्रश करू शकतात. या उपायाने हिरड्यांमधून रक्त येणे बंद होते, दात स्वच्छ होतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.