Osteopenia is pre-osteoporosis reduced bone fragility bone pain and early fatigue Sakal
आरोग्य

Bone loss : हाडांचा कमकुवतपणा...!

ऑस्टियोपोरोसिस या आजारात हाडे कमकुवत होतात व तुम्हाला हाड फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता

सकाळ वृत्तसेवा

ऑस्टियोपोरोसिस या आजारात हाडे कमकुवत होतात व तुम्हाला हाड फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते. ऑस्टियोपेनिया म्हणजे ऑस्टियोपोरोसिस होण्यापूर्वीची स्थिती यात हाडांची ठिसूळता कमी होते व हाडे दुखतात लवकर थकवा जाणवतो. देशभरात ऑस्टियोपोरोसिसचे प्रमाण ५ कोटींपेक्षा अधिक आहे.

ऑस्टियोपोरोसिस ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून येतो. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. ऑस्टिओपेनिया काही तरुण वयोगटातील महिला महिला व पुरूषांमध्येही आढळतो.

वेळेवर उपचार न केल्यास त्याचे रूपांतर ऑस्टियोपोरोसिसमध्ये होऊ शकते. ऑस्टियोपोरोसिस ही भारतीय महिलांमध्ये एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. मासिक पाळी गेलेल्या महिलांमध्ये याचे प्रमाण लवकर व तीव्र दिसून येते.

ऑस्टियोपोरोसिसची लक्षणे

डॉक्टर याला मूक रोग असे म्हणतात. कारण अन्य इतर आजारांप्रमाणे याची लक्षणे असतातच असे नाही. ते तपासणीमध्ये आढळून येतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकाने आपली हाडं तपासून घ्यावीत. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करणे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

अन्य महत्त्वाची लक्षणे

१) किरकोळ अपघातानंतर हाड तुटणे.

२) लहानपणी किंवा हाडाला हेअर क्रॅक असणं. ऑस्टियोपोरोसिसमुळे थेट लक्षणे उद्‍भवत नसतील; परंतु तुमच्या शरीरात काही बदल दिसून येतात.

अ) तुमची उंची कमी होणे. ब) पाठीला अधिक बाक दिसणे.

३) पाठीच्या खालच्या भागात वेदना.

ऑस्टियोपोरोसिस होण्याची कारणे

  • वय वाढते तसे हाड पुढे वाढण्याची क्रिया बंद होते. वयाच्या ३५ नंतर हाडांचे वस्तुमान हळूहळू कमी होते.

  • कौटुंबिक इतिहास.

  • उंची कमी असलेल्या लोकांमध्ये हाडांचे प्रमाण कमी असते, त्यामुळे कोणतेही हाडांवरील नुकसान अधिक परिणामकारक असू शकते.

  • धूम्रपान व तंबाखू खाणारे.

  • काही आरोग्य परिस्थितीमुळे ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यता वाढते.

उदा.

१) ग्रंथीचे विकार ः थायरॉईड, मधुमेह, पॅराथायराईडचे विकार.

२) आतड्याचे आजार अतिसार

३) संधिवात, अॅकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस

४) रक्ताचा कर्करोग (मायलोमा)

काही औषधे

अ) कॉर्टिकोस्टिरॉईडस

ब) अपस्मार (इपिलेप्सीवर) वापरली जाणारी औषधे.

क) रक्त पातळ करणारी औषधे.

ड) अॅसिडिटीची औषधे.

इ) कर्करोगासाठी वापरली जाणारी हार्मोन थेरपी.

ई) वजन कमी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया.

५) आहारात कॅल्शिअम व ‘व्हिटॅमिन-डी’ ची कमतरता

६) पुरेसा शारीरिक व्यायाम न झाल्यास

७) ऑस्टियोपोरोसिस निदान करणाऱ्या सुविधांचा अभाव.

८) हाडांच्या आरोग्याविषयी जाणीव नसल्याने हाडांकडे दुर्लक्ष केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT