Osteoporosis  esakal
आरोग्य

Osteoporosis : चाळीशीनंतर येतो, हाडे ठिसूळ करणारा शत्रू; तेव्हा वेळीच करा हे उपाय

हाडे ठिसूळ होण्याच्या १ महिना आधीच शरीरात सात ते आठ लक्षणे दिसून येतात

सकाळ ऑनलाईन टीम

Osteoporosis : आरोग्य संपन्नआयुष्य जगण्याची सर्वांचीच इच्छा असते. परंतु वय वाढत असताना अनेक व्याधीही वाढतात. वय वाढत असताना ऑस्टिओपोरेसिस अर्थात हाडे ठिसूळ होण्याची सायलेंट किलर व्याधी सुरू होते. शांतपणे हाडे पोकळ करून टाकणारा हा आजार सहज टाळता येतो. हाडे ठिसूळ होण्याच्या १ महिना आधीच शरीरात सात ते आठ लक्षणे दिसून येतात. यातही महिलांना सर्वाधिक धोका आहे, यामुळे लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला अस्थिरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

हाडे ठिसूळ होण्याची सुरवातीची लक्षणे

पाठीचा कणा, मनगट, कुल्हे सहजपणे फ्रॅक्चर होतात

कमरेला वाक आल्यामुळे उंची कमी होते

पाठदुखी, हाडे दुखणे या समस्या उद्भवतात

हिरड्या आणि दात कमकुवत होणे

ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय?

हा हाडांशी संबंधित आजार आहे. उत्तम आरोग्यासाठी हाडे मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहे. शरीराला आधार देण्यासोबतच अवयवांचे रक्षणही करण्याचे काम हाडे करत असतात. वृद्धत्व किंवा बैठी जीवनशैली यामुळे हाडे ठिसूळ (ऑस्टिओपोरोसिस) होऊ शकतात. हा असा आजार आहे ज्यामध्ये हाडे पोकळ होतात. हाडांची घनता कमी होते. हाडांच्या उती खराब होऊ लागतात. त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. त्याच्या काही लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे, असा सल्ला अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी दिला.

स्त्रियांना धोका जास्त(सर्वेक्षण)

नोकरपेशा महिला - ५५.२८ टक्के

बांधकाम मजूर महिला - ४९.३६ टक्के

फर्मवर काम करणाऱ्या महिला - ४१.०० टक्के

शिक्षिका - ३६.०० टक्के

गृहिणी - ३२.०० टक्के

आहारात काय असावे?

कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्यावा

दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा

फोर्टिफाइड पदार्थांचा आहारात समावेश करा (Lifestyle)

हाडे ठिसूळ होणे टाळण्यासाठी

चालणे, जॉगिंग, डान्स करा

वजन उचलण्याचे व्यायाम

धुम्रपानापासून दूर राहावे

ऑस्टिओ म्हणजे अस्थी आणि पोरेसिस म्हणजे सच्छिद्रता वाढणे. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्स कमी होतात. याचा परिणाम हाडांवर होतो. हाडे कमकुवत झाल्याने ठिसूळ होतात. हाड मोडण्याचा धोका वाढतो. पन्नाशीतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला ‘ऑस्टिओपोरेसिस'' या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. लक्षणे दिसत नसल्याने महिलांचा गुप्त शत्रू असे या आजाराला संबोधले जाते. ग्रामीण महिलांमध्ये या आजाराविषयी जनजागृतीची गरज आहे. (bone health)

-डॉ. संजीव चौधरी, प्रसिद्ध अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT