जास्त व्यायाम धोकादायक Esakal
आरोग्य

Over Exercise Effects: जास्त Exercise करणं हृदयासाठी धोकादायक, मग ‘या’ व्यायामाला द्या पसंती..

बरेचजण फिट राहण्यासाठी जीममध्ये जाऊन तासनतास एक्सरसाइज करतात. मात्र आता अती एक्सरसाइजदेखील हार्ट अटॅकसाठी कारण ठरू लागली आहे

Kirti Wadkar

Over Exercise Effects: गेल्या काही वर्षात म्हणजेच कोरोना काळापासून हार्ट अटॅक येणं तसंच हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्याचं प्रमाण वाढलं आहे.

एकेकाळी  केवळ सर्वसामान्यपणे मोठ्या वयाच्या लोकांना हार्ट अटॅक Heart Attack येत असे मात्र अलिकडे अगदी कमी वयातच म्हणजेच ३०-४० वयोगटातील लोकांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. Over Exercise in Gymnasium may be harmful for hearth

त्यातही खास करून जीम करणाऱ्या तरुणांना जीममध्येच Gymnasium किंवा जीम केल्यानंतर काही तासांत हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव तसचं अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी यांचाही जीममधून परतल्यानंतर काही वेळात हार्ट अटॅकने निधन झालं होतं. अगदी कमी वयात हार्ट अटॅक येणं आणि हृदय विकारालासंबधी समस्या निर्माण होवू लागल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. 

हे देखिल वाचा-

कोविड १९ नंतर हृदयाशी संबधीत समस्या वाढू लागल्या आहेत. तज्ञांच्या माहितीनुसार कोविडची लागण झाल्याने शरीरामधील रक्त वाहिकांमध्ये ब्लड क्ल़ॉट बनण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे.

यामुळे हृदयाशी संबंधित Heart disease आजार वाढू लागले आहेत. या शिवाय  लॉकडाऊनच्या काळातील सुस्त जीवनशैली, अयोग्य आहार तसचं ताण यासाठी जबाबदार आहेत.

सोबतच ३०-४० या वयोगटातील अनेक व्यक्तीवर कामाचा प्रचंड ताण असतो त्यामुळे अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा, आहाराकडे दुर्लक्ष, धूम्रपान आणि दारूचं सेवन या सगळ्याचं गोष्टींचा हृदयाच्या कार्यावर विपरीत परिणाम होवू लागला आहे. 

बरेचजण फिट राहण्यासाठी जीममध्ये जाऊन तासनतास एक्सरसाइज करतात. मात्र आता अती एक्सरसाइजदेखील हार्ट अटॅकसाठी Over exercise disadvantage कारण ठरू लागली आहे.

तज्ञांच्या माहितीनुसार जे लोक खूपवेळ व्यायम करतात त्यांनी ते फिट आहेत असं समजू नये. कारण बऱ्याचदा वरून फिट दिसणाऱ्या व्यक्तीचं शरीर आतून कमकुवत असू शकतं. अशा आतून कुमकुवत आणि निरोगी असलेल्या शरीरावर जर अधिक ताण आला तर सहाजिकच त्याचे दुष्परिणाम हे दिसणारचं. 

फिट राहण्याचे सुरक्षित पर्याय

हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तरी ओव्हर एक्सरसाइज करणं टाळावं. फिट राहण्यासाठी चालणं हा सर्वात सुरक्षित आणि योग्य पर्याय आहे .

तर भोपाळमधील एम्सच्या संशोधनात डॉक्टरांनी सायकलिंग हा देखील फिट राहण्यासाठी चांगला पर्याय असल्याचं सांगितलं आहे.

सायकलिंगमुळे फिटनेससोबतच मानसिक स्वास्थ्यदेखील टिकून राहण्यास मदत होते असं डॉक्टरांच म्हणणं आहे. दररोज अर्धा तास सायकलिंग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहू शकतं. 

बॉडी बिल्डिंग सप्लिमेंट धोकादायक

अलिकडे अनेक तरुण कमी वेळेत चांगली बॉडी बनवण्यासाठी वेगवेगळ्या सप्लिमेंटचा उपयोग करतात. कोणत सप्लिमेंट त्यांच्या बॉडी टाइपसाठी योग्य आहे ? त्याचा साइड इफेक्ट काय होवू शकतं? ते किती प्रमाणात घ्यावं? ही माहिती न घेताच अनेकजण या सप्लिमेंट घेण्यास सुरुवात करतात.

अनेकदा बाजारात बनावट सप्लिमेंटही उपलब्ध असतात त्यामुळे त्याची पडताळणी करणंही गरजेचं आहे. शिवाय त्याचा ओव्हरडोस झाल्यास ते धोकादायक ठरू शकतं आणि हार्ट अटॅकची जोखिम वाढू शकते. 

हे देखिल वाचा-

एक्सरसाइज करताना या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं

जिममध्ये वर्कआउटला सुरुवात करण्यापूर्वी वाॅर्मअप करणं अत्यंत गरजेच आहे Warm up before workout. अनेकजण वार्मअप न करताच ट्रेडमिलवर जलदगतीने पळण्यास सुरुवात करतात. यामुळे तुमचा हार्टरेट अचानक वाढण्यास सुरुवात होते.

त्यामुळे कोलॅप्स होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आधी वर्कआउट करावा. याशिवाय अनेक तरुण सिक्सपॅक्स किंवा नवे ट्रेंड पाहूण त्यांच्या शारीरिक क्षमतेहून अधिक वेस्ट उचलतात. त्यासोबतच एक तासांहून जास्त वेळ किंवा काही  वेळा दिवसातून दोनदा वर्कआउट करतात.

असं करणं कालांतराने हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं. वर्कआउटचे नवे ट्रेंड फॉलो करण्याआधी त्यातील जोखिम आणि तुमची क्षमता याचा विचार नक्की करा. 

जिममधील वर्कआउट म्हणजे केवळ व्यायाम नव्हे

दररोज एक्सरसाइज करण्याचे शरीराला नक्कीच फायदे असतात. प्रत्येकाने फिट राहण्यासाठी दररोज किमान ३०-४० मिनटे व्यायाम करणं गरजेचं आहे. मात्र इक्सरसाइजा अर्थ केवळ जिममध्ये जाऊन हेवी वेटस् उचलणं आणि ट्रेडमिलवर पळणं नव्हे हे लक्षात घ्यायला हवं.

एक्सरसाइज म्हणजेच फिजिकली अॅक्टिव्ह असणं. तुम्ही किती सक्रिय आहात यावर तुमचा फिटनेस अवलंबून असतो. फिट राहण्यासाठी तुम्ही सायकलिंग, स्विमिंग, गार्डनिंग, वॉकिंग किंवा योगा, झुंबा डान्स असे इतरही पर्यायांची निवड करू शकता. यामुळे तुमचं मानसिक संतुलनही चांगलं राहतं. Exercises for physical and mental Health.   

योग्य आहार गरजेचा

फिट राहण्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. अलिकडे बदलत्या जीवनशैलीमुळे प्रोसेस्ड फूड, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड तसचं, जास्त कार्बस् असलेले पदार्थ, जंक फूडचं प्रमाण वाढलंय. यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून त्याचा हृदयावर परिणाम होवू लागला आहे.

प्रोटीनयुक्त तसचं चांगले फॅटस् आणि फायबर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. धूम्रपान हे हृदयाशी निगडीत समस्यांसाठी सर्वात मोठं कारण आहे. त्याचसोबतच अल्कोहोल म्हणजेच मद्यपान करणंही धोकादायक आहे. 

योग्य आहार आणि पुरेशी झोप ही शरिरासाठी गरजेची आहे. तसचं ताण तणाव कमी घेऊन जीवनशैलीत सुधारणा केल्यास हृदयासंबधी समस्या नक्कीच कमी होवू शकतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT