Pentagram of human body sakal
आरोग्य

मानवी शरीराचे पंचकोश

आयुर्वेदानुसार मानवी शरीराचे पाच कोश आहेत, म्हणजेच ते पाच थरांनी बनलेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

आयुर्वेद हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट अशा थोर आचार्यांनी व शास्त्रज्ञांनी आयुर्वेदामध्ये संशोधन केले, महत्त्वाचे ग्रंथ लिहून विज्ञान म्हणून त्याला विकसित केले. आजच्या लेखामध्ये आपण मानवी शरीरातील पंचकोशांबाबत जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदानुसार मानवी शरीराचे पाच कोश आहेत, म्हणजेच ते पाच थरांनी बनलेले आहे.

आपल्या शरीराचे मुख्य तीन भाग आहेत : जड शरीर (जे डोळ्यांनी दिसतं, इंद्रियांना जाणवतं), सूक्ष्म शरीर (ज्याच्या कार्याच्या अनुभूतीने त्याच्या अस्तित्वाचा अंदाज लावता येतो) आणि अति सूक्ष्म शरीर (जाणिवेच्या पलीकडचे).

1) अन्नमय कोश : अन्नमयकोश म्हणजे भौतिक देह (स्थूल देह), याचे पोषण अन्नाच्या सेवनाने होते. हे शरीर आपल्याला डोळ्यांनी दिसते. आपले सर्व अवयव, सर्व पेशी याच शरीराचा भाग आहेत. मात्र, या शरीराला मानसिक शरीराची जोड नसेल, तर फारशी कार्यशीलता उरत नाही, हे आपण कोमामधील पेशंट पाहून समजू शकतो.

2) मनोमय कोश : शरीरातील प्रत्येक पेशीला मन आहे किंवा त्या सचेतन आहेत आणि याचे संपूर्ण मिळून एक मानसिक शरीर तयार होते, म्हणजेच मन. या कोशामध्ये बुद्धी, विचार आणि भावनांची प्रक्रिया समाविष्ट असते. हे डोळ्याला थेट दिसत नाही; परंतु प्रत्येकाच्या स्वभाव, भावनिक रचना यांच्यावरून आपल्याला या शरीराच्या अस्तित्वाचा अंदाज येतो.

3) प्राणमय कोश : जिवंत राहण्यासाठी एक ऊर्जा सतत आपल्यामध्ये कार्यरत असते. प्राणमय कोश म्हणजे हे ऊर्जेचे शरीर. याचे अस्तित्व हेच जिवंत माणसाला मृतापासून वेगळे करते. प्राण हा शरीरात नाड्या किंवा ऊर्जा वाहिन्यांमधून वाहतो. आयुर्वेदानुसार प्राणमय कोश हे ७२ हजार ऊर्जेच्या वाहिन्या म्हणजेच नाड्यांनी बनलेले आहे. आपण जो योग, प्राणायाम करतो तो याच कोशाला उद्देशून करतो.

जसे प्रत्येक यंत्राला एक हार्डवेअर, एक सॉफ्टवेअर आणि एक पॉवर सप्लाय असतो, त्याचप्रमाणे अन्नमय, मनोमय आणि प्राणमय कोश आहेत.

4) विज्ञानमय कोश : ज्ञानाने (नॅचरल इंटेलिजन्स) संपन्न आहे. मानवी शरीरात उपचार करण्याचे नैसर्गिक कार्य ज्याला आपण ‘नॅचरल हीलिंग’ म्हणतो ते देखील या कोशाद्वारे नियंत्रित केले जाते.

5) आनंदमय कोश : सर्वांत आतमधील कोष - ज्या शक्तीने आपल्याला बनवले आहे ती शक्ती किंवा त्या शक्तीचा अंश इथे वास करतो असे मानणे आहे. आनंदमय कोश म्हणजेच ‘आनंदाने बनवलेले आवरण’. आनंद ही ज्ञानाच्याही पुढची अनुभूती आहे. सर्व रिपूंतून बाहेर पडल्यानंतर जो उरतो तो आनंद. निर्भेळ, निःस्वार्थी आनंद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT