People who dont drink coffee and sit for six or more hours a day have 60 percent higher risk of dying  
आरोग्य

Health Tips: ऑफिसमध्ये एकाच जागी बसून आजारी पडताय? 'हा' एक कप वाचवू शकतो तुमचा जीव, कसे ते वाचा

दिवसभर एका जागी बसण्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

सकाळ डिजिटल टीम

ऑफिसमध्ये कामाचा ताण अधिक असतो. कधी कधी बॉसने दिलेलं टार्गेट पुर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना एकाच जागी बसून काम कराव लागतं. पण दिवसभर एका जागी बसण्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे एका जागी बसताना प्रत्येक कर्मचाऱ्याने थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कॉफी महत्त्वाची ठरते.

जे लोक कॉफीचे सेवन करत नाहीत आणि दिवसभरात सहा तास किंवा त्याहून अधिक वेळ बसतात त्यांच्या मृत्यूचा धोका 60 टक्क्यांनी वाढतो. ‘बायोमेड सेंट्रल (बीएमसी) पब्लिक हेल्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

तर, चीनमधील सोचो युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांना असेही आढळून आले की, जे लोक दिवसातून किमान 6 तास बसून काम करत आहेत आणि ते कॉफी पीतात.

अशा लोकांमध्ये मृत्यूचा धोका 24 टक्के कमी आहे. त्यामुळे तुमचे काम एकाच जागी बसून असेल तर कॉफी प्या. त्याचा आरोग्यास अधिक फायदा होतो. असे संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे.

कॉफीमध्ये अनेक पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी 2), नियासिन (व्हिटॅमिन बी 3), मॅग्नेशियम, पोटॅशियम, विविध फिनोलिक संयुगे आणि अँटीऑक्‍सिडंट्‌स कॉपीमध्ये असतात. तज्ञांच्या मते, या पोषक तत्त्वांचा मानवी शरीराला विविध प्रकारे फायदा होऊ शकतो.

चरबी कमी करण्यास मदत करते

कॅफीन चयापचय दर 3-11 टक्‍क्‍यांनी वाढवू शकते. म्हणूनच कॉफीला फॅट बर्निंग पूरक मानले जाते. लठ्ठ लोकांची चरबी कमी करण्यासाठी कॅफिन उपयुक्त ठरते.

कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो

कॉफीमध्ये आढळणारे कॅफीन रक्तदाबासह हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका 15 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होतो.

उर्जा मिळते

तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यासाठी सकाळी एक कप कॉफी पुरेशी आहे. यासोबतच ते प्यायल्याने भूक लागण्याची समस्याही कमी होते. यामध्ये आढळणारे कॅफिन भूक नियंत्रित करते. त्यामुळे कॉफीचे सेवन तुमचा पूर्ण दिवस ताजातवाना ठेवण्यासाठी नक्कीच करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT