Piles Health Tips esakal
आरोग्य

Piles Health Tips : 'या' चुकीच्या सवयींमुळे वाढतायेत मुळव्याधीचे रुग्ण, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

वाढत्या वयाचं दुखणं म्हणून ओळखला जाणारा हा आजार आता तरूणांमध्येही मोठ्याप्रमाणात दिसत आहे. अलिकडच्या काही वर्षात मुळव्याधीचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Piles Health Tips : मुळव्याध हे दुखणं कोणाला सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी अवघड परिस्थिती होते. पूर्वी वाढत्या वयाचं दुखणं म्हणून ओळखला जाणारा हा आजार आता तरूणांमध्येही मोठ्याप्रमाणात दिसत आहे. अलिकडच्या काही वर्षात मुळव्याधीचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे.

कोरोनानंतर बदललेल्या जीवनशैलीचा यावर खूप मोठा परिणाम असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. तरूणांची बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी हे सगळं यासाठी कारणीभूत आहे.

मूळव्याधाची लक्षणं नेमकी कोणती?

शौचाच्या मार्गे सूज येणं, शौचाच्या मार्गातून रक्तस्राव होणं, शौच करताना अडखळल्यासारखं वाटणं, आग होणं, जळजळणं, खाज सुटणं यांसारखी लक्षणं मूळव्याधातून जाणवतात.

या चुका टाळा

  • आहार विहारातला असमतोल.

  • तासन् तास एका जागी बसून काम करणं.

  • भाज्या, फायबरचं कमी सेवन

  • व्यायाम करण्याचा कंटाळा

हे ही वाचा - संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

अशी घ्या काळजी

  • नियमित फायबर्स, भाज्या, पालेभाज्या, फळांचं सेवन वाढवा

  • 3-5 लीटर पाणी प्यावं.

  • अति प्रमाणात चहा, कॉफी यांचं सेवन टाळा

  • मद्यपान कमी करणे.

  • यांसारख्या सवयींमुळे बद्धकोष्टतेचा त्रास होतो. बद्धकोष्टता हा मूळव्याधाचा जन्मदाता आहे.

  • नियमितपणे व्यायाम करा.

त्रास होत असल्यास काय करावं?

सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मनाने औषधे घेऊ नका. सर्वात आधी डॉक्टरांकडे जाऊन या आजाराचं निदान करून घेणं गरजेचं आहे. आणि नेमकं निदान झाल्यानंतर त्यावर कोणत्या प्रकारचा आहार घेतला, कोणत्या प्रकारची दिनश्चर्या केली तर आपल्याला बरं वाटेल हे आपण समजून घेतलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाही प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT