positive mindset thought process and its benefits  sakal
आरोग्य

सकारात्मक विचारसरणीचे फायदे

सकारात्मक विचारसरणीचे विविध घटक आपण गेल्या दोन भागांत बघितले. संशोधनाअंती सकारात्मक विचारसरणीचे खूप फायदे लक्षात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. विद्याधर बापट

सकारात्मक विचारसरणीचे विविध घटक आपण गेल्या दोन भागांत बघितले. संशोधनाअंती सकारात्मक विचारसरणीचे खूप फायदे लक्षात आले आहेत.

१ आयुष्यमान वाढणं

२ ताण-तणावाचं निराकरण

३ अस्वस्थतेचे आजार व नैराश्याचा आजार टाळणं किंवा झाल्यास लवकर बरं होण्यात मदत होणं

४ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढणं

५ व्यक्तिमत्त्वविकास

६ शारीरिक व मानसिक आजार लवकर बरे होणं

७ भौतिक आयुष्यात हवं असणारं यश, समृद्धी स्वकर्तृत्वानं मिळवता येणं

८ सकारात्मक विचारसरणी रुजवण्यासाठी व्हिज्युअलायझेशन तंत्रे व स्वयंसूचना यांचा चांगला उपयोग होतो.

व्हिज्युअलायझेशन तंत्र

एका जागी शांत बसावं. शवासनाप्रमाणे क्रमाक्रमाने पायापासून डोक्यापर्यंत एक एक अवयव रिलॅक्स झालाय अशी कल्पना करावी. एखादं निसर्गरम्य किंवा मन शांत होईल असं प्रतिमाचित्र, दृश्य डोळ्यासमोर आणावं. पाचही सेन्सेसच्या साह्यानं आपण तिथं आहोत आणि आणि आनंद घेतोय अशी कल्पना करावी.

मन शांत झालं, की आपण ज्या प्रसंगांमध्ये नकारात्मक विचार करतो किंवा अस्वस्थ होतो असे प्रसंग डोळ्यासमोर आणावे. आता अतिशय आत्मविश्वासानं, सकारात्मक पद्धतीनं आपण त्याला तोंड देत आहोत अशी कल्पना करावी.

प्रत्यक्ष तसं घडत आहे यावर विश्वास ठेवावा. ही कल्पना वारंवार करावी. त्यात अगदी लहान लहान डिटेल्स असावे. उदा. प्रसंग घडतोय तिथलं वातावरण, प्रकाश, हवा, आपली सकारात्मक देहबोली वगैरे. आपण सर्व प्रसंगात आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा यांनी परिपूर्ण आहोत हा विश्वास मनात जागृत ठेवावा. हे तंत्र दिवसातून दोन वेळा तरी विविध प्रसंग कल्पनेत अनुभवून करावं.

सकारात्मक स्वयंसूचना

शवासनातल्याप्रमाणे सर्व अवयव रिलॅक्स करून घ्यावेत. शांत अवस्थेत स्वत:ला मनापासून स्वयंसूचना द्याव्यात. उदा. मी भरपूर ऊर्जा, आत्मविश्वास आणि अपरिमित आनंदाने परिपूर्ण आहे. आजचा दिवस खूप छान जाणार आहे. मी स्वस्थ आणि आनंदी असेन. माझं शारीरिक व मानसिक आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. ही निरामय जीवनाकडे वाटचाल आहे इत्यादी. सूचना देताना कल्पनेत, अर्थाप्रमाणे तशी भावना निर्माण होणं गरजेचं आहे.

मनाचं पॉझिटिव्ह रिप्रोग्रॅमिंग शक्य आहे. फक्त स्वत:त बदल घडवण्याची तीव्र इच्छा हवी. सकारात्मक विचारसरणी असलेली व्यक्ती स्वत: आनंदी असतेच; पण त्याचबरोबर आसपास असणाऱ्या लोकांना ऊर्जा देते. आपण काही विशिष्ट व्यक्तींच्या सहवासात गेलो, की छान वाटतं त्याचं कारण हेच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT