Anulom Vilom Pranayam Benefits : योगाचा मोठा फायदा आपल्या आरोग्यासाठी होत असतो हे आपल्याला माहितच आहे. शरीराच्या आणि मानसिक आरोग्यासाठी सर्व प्रकारचे व्यायाम आणि विशेषतः प्राणायामाचा खूप मोठा सकारात्मक परिणाम दिसून येत असतो.
यामुळे मन आणि शरीर दोन्हीही शांत होतात. यासाठी एक सोपा प्राणायाम प्रकार म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. हा प्रमाणायाम रोज केवळ ५ मिनीटे केला तरी त्याचे आश्चर्यकारक फायदे दिसून येतात.
फायदे कोणते, जाणून घेऊया
पचन क्षमता सुधारते
रोज अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने पोटाशी निगडीत समस्या दूर होतात. यामुळे बद्धकोष्ठता, इन्फेक्शन या पासून सुटका होऊ शकते. पचन क्षमता सुधारते.
ब्लड प्रेशर नियंत्रित होते
रोज प्राणायाम केल्याने ब्लड फ्लो नियमित राहतो. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहते. आणि संपूर्ण शरीर आणि नसांना शुद्ध करते.
हृदय हेल्दी राहतं
अनुलोम विलोम केल्याने ब्लॉकेजेस थांबवले जाऊ शकतात. यामुळे ब्लड फ्लो सुधारतो. त्यामुळे हा प्राणायाम केल्याने हार्ट अॅटॅक आणि कार्डियाक अरेस्ट पासून बचावाला मदत मिळते.
फुफ्फूसांची ताकद वाढते
हा प्राणायाम केल्याने फुफ्फूसात अडकलेला विषारी गॅस बाहेर काढला जाऊ शकतो. यामुळे फुफ्फूसांची ताकद वाढण्यास मदत मिळते.
डिप्रेशनवर उपाय
रोज अनुलोम विलोम केल्याने मेंदूकडे ब्लड फ्लो सुधारतो. यामुळे मूड फ्रेश राहतो. यासोबतच जीव घाबरणे, निराशा यासारख्या समस्या दूर होतात.
श्वसनाशी निगडीत समस्या
श्वसनाचा आजार असणाऱ्या लोकांनी हा प्राणायाम तर करायलाच हवा. यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया सोपी होते आणि फुफ्फूसे व्यवस्थित ऑक्सिजन घेऊ शकते.
डोळ्यांसाठीही उपयुक्त
रोज अनुलोम विलोम केल्याने श्वसन आणि हृदयाशी निगडीत आजारांमध्ये सुधार होतो. यामुळे डोळ्यांना फायदा पोहचतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.