मुंबई : मलेरिया हा खरं तर प्लास्मोडियम या परजीवी द्वारे पसरणारा रोग आहे. त्याची वाहक मादी अॅनोफिलीस डास आहे. संक्रमित मादी अॅनोफिलीस डास एखाद्या व्यक्तीला चावल्यास मलेरियाचा प्रसार होतो. निष्काळजीपणामुळे किंवा योग्य उपचारांच्या अभावामुळे मलेरिया अत्यंत धोकादायक ठरू शकतो आणि त्यात मानवी जीवही जाऊ शकतो.
प्लास्मोडियम नावाचा परजीवी तुमच्या रक्तात पोहोचतो आणि शरीरातील लाल रक्तपेशी नष्ट करू लागतो. हा डास बहुतांशी ओलसर आणि पाणथळ ठिकाणी आढळतो. त्यामुळेच डासांपासून बचाव करण्यासाठी घर स्वच्छ ठेवा आणि घराभोवती पाणी साचू देऊ नका असे सांगितले जाते. (Precautions for malaria disease cleanliness tips for malaria) हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
अशाप्रकारे मलेरिया टाळा :
१. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे. त्यामुळे डासांपासून दूर राहण्यासाठी घराच्या दारे-खिडक्यांना लोखंडी जाळ्या लावा. पूर्ण पँट आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे शरीर पूर्णपणे झाकले जाईल आणि डास चावू शकणार नाहीत.
२. पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात स्वतःला चांगले हायड्रेटेड ठेवून तुम्ही मलेरियावर मात करू शकता. या दिवसांमध्ये शरीर गरम असते. उष्णता काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिण्यासोबतच नारळपाणी, ज्यूस इत्यादीही प्यावे.
३. डास नेहमी दारे आणि खिडक्यांजवळ आणि घराच्या कोपऱ्यात लपतात. या ठिकाणी डासनाशक फवारणी करा. याशिवाय, तुम्ही डास असलेल्या रिफिलचा वापर करा.
४. घराभोवती नेहमी स्वच्छता ठेवा आणि पाणी साचू देऊ नका. डास पाण्यात अंडी घालतात त्यामुळे कूलरची टाकी, जवळपासचे खड्डे किंवा अशा कोणत्याही ठिकाणी पाणी साचू देऊ नका.
५. ज्या ठिकाणी कचरा किंवा घाण असेल अशा ठिकाणी जाऊ नका, कारण ती ठिकाणे डासांच्या उत्पत्तीसाठी चांगली ठिकाणे आहेत. तसेच संध्याकाळी पार्क्स वगैरे मध्ये न जाता घरीच थांबा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.