womens sakal
आरोग्य

तर काय?

माझी मुलगी १२ वर्षांची आहे. तिच्या वेळी गरोदर असताना मला घरात खूप मानसिक त्रास झाला होता. त्यामुळे रडणे, चिडचिड करणे, झोप न लागणे वगैरे त्रास झाले.

सकाळ वृत्तसेवा

प्रश्‍न २ - माझी मुलगी १२ वर्षांची आहे. तिच्या वेळी गरोदर असताना मला घरात खूप मानसिक त्रास झाला होता. त्यामुळे रडणे, चिडचिड करणे, झोप न लागणे वगैरे त्रास झाले. गेल्या २-३ महिन्यांपासून मुलीचे वागणे खूप बदलले आहे. ती कुठल्याच गोष्टीमुळे खूश होत नाही. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेते. लहानपणापासूनच अभ्यासात थोडी मंद आहे. स्वतःच्या लहान बहिणीशीही खूप ईर्ष्या ठेवते. आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काहीही उपयोग होत नाही. काय करता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे.

- सौ. पाटील, कोल्हापूर

उत्तर - गर्भारपणात होणारा प्रत्येक शारीरिक व मानसिक बदल बाळाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर दीर्घकाळ परिणाम घडवताे. ११-१२ वे वर्ष हा मुलांमध्ये पौडंगावस्थेचा काळ असल्यामुळे या काळात होणारा हॉर्मोन्सचा बदल त्यांच्या स्वभावाला, मानसिकतेला प्रभावित करत असतो. मुलीला शाळेबरोबर कुठल्यातरी करमणुकीचे खेळ, छंद जोपासता येईल अशा वर्गांना घालावे. मोबाईल व टीव्ही जेवढा कमी पाहिला जाईल तेवढे बरे. रोज संध्याकाळी तिला व तिच्या लहान बहिणीला बरोबर घेऊन देवासमोर किंवा घरात कुठेही एकत्र बसून एखादे-दुसरे स्तोत्र म्हणावे, एखादी गोष्ट सांगावी. रात्री झोपताना संतुलन रिलॅक्स सिरप देण्याचा तसेच संतुलन ब्रह्मलीन तेल टाळूवर लावण्याचा उपयोग होऊ शकेल.

घरात थोडा वेळ तरी श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांची ॐकार गणेश, स्पिरीट ऑफ हार्मनी वगैरेंसारखे स्वास्थ्यसंगीत मुलींच्या उपस्थितीत लावणे चांगले राहील. सकाळ-संध्याकाळ सॅन ब्राह्मी व संतुलन पित्तशांती या गोळ्या देणे सुरू करावे. गरज वाटल्यास समुपदेशकाचा सल्ला घेणेही उपयुक्त ठरू शकेल. घरातील प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की घरातील मुलांची एकमेकांशी कधीही तुलना करू नये. प्रत्यक्ष सल्ला घेतल्यास काही विशेष औषधोपचार वा आयुर्वेदिक थेरपीचा उपयोग होण्याची शक्यता अजमावता येईल.

प्रश्‍न १ : माझे वय ५७ वर्षे आहे. गेली २० वर्षे कुठले तरी रेचक औषध घेतल्याशिवाय माझे पोट साफ होत नाही. तसेच जेवल्या जेवल्या लगेचच पोटात गॅस असल्याची भावना येते. यासाठी काही उपाय सुचविणे.

- सौ. भारती, पुणे

उत्तर - जसे जसे वय वाढते, तशी तशी शरीरात स्निग्धता कमी होते, अर्थात आतड्यांमध्येही कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळे वय वाढल्यावर बऱ्याचदा शौचाला साफ होत नाही. यासाठी एक कप कोमट पाण्यात १-२ चमचे साजूक तूप व चिमूटभर सैंधव घालून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. तसेच आहारात ४-५ चमचे साजूक तुपाचा समावेश असावा. जेवणाच्या वेळी पोळी, भाकरी, भात वगैरेंवर तूप घालता येते. यामुळे हळूहळू पचनशक्ती सुधारून आतड्यांमध्ये स्निग्धता वाढून, आतड्यांना मृदूपणा येऊन पोट साफ व्हायला मदत मिळेल.

जेवणांनंतर संतुलन अन्नयोगसारखी गोळी व सॅनकूलसारखे चूर्ण नियमितपणे घ्यावे. दिवसातून एकदा संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल पोटावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेत हलक्या हाताने चोळावे. वयाच्या हिशेबाने संतुलन पंचकर्म करून घेण्याचा फायदा मिळेल. शरीरशुद्धीबरोबर शास्त्रोक्त बस्ती अर्थात एनिमा घेण्यानेही आतड्यांचा कोरडेपणा कमी व्हायला मदत मिळू शकेल. पचन सुधारले, पोट साफ व्हायला लागले की गॅसेसचा त्रासही कमी होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT