अन्न खा भरपूर चावून Esakal
आरोग्य

Meal Tips जेवण नीट न चावताच गिळताय, मग आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक

जर तुम्ही पोषक आणि हेल्दी पदार्थ देखील चांगल्या प्रकारे न चावता खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यासाठी कोणताच फायदा होणार नाही

Kirti Wadkar

आरोग्य चांगलं राखण्यासाठी पोषक आहार Healthy Diet घेणं गरजेचं आहे. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि त्यानुसार अनेकजण पोषक आहार घेण्यावर भरही देतात. Proper Chewing of food is important for good health

मात्र हे पोषक पदार्थ Healthy Food जर तुम्ही योग्यरित्या खात नसाल तर त्याचा आरोग्याला कोणताही फायदा न होता उलट नुकसान होण्याची शक्यता वाढते. अनेकजण वेळेअभावी- घाई-गडबडीत किंवा मोबाईल Mobile आणि टिव्ही पाहण्यात मग्न असल्याने पदार्थ योग्यरित्या न चावताच खातात. घाईघाईत वरचेवर चावून पदार्थांचे मोठे मोठे तुकडेच गिळणं ही अत्यंत चुकीची पद्धत आहे.

जर तुम्ही पोषक आणि हेल्दी पदार्थ देखील चांगल्या प्रकारे न चावता खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यासाठी कोणताच फायदा होणार नाही. यामुळे तुम्हाला पोटदुखी, अपचन, अॅसिडीटी आणि वजन वाढण्यासारख्या समस्यांसोबतच इतर काही समस्यादेखील निर्माण होवू शकतात.

पदार्थांमधील सर्व पोषक तत्त्वं शरीराला मिळण्यासाठी प्रत्येक पदार्थ बारिक चावून खाणं गरजेचं आहे. पदार्थ बारिक चावून खात असताना त्यामध्ये लाळ मिसळते. जेणेकरून त्याचा शरीराला योग्य फायदा होतो.

पचनाच्या समस्या होतील दूर

अनेकदा योग्य प्रकारे अन्न चावून न खाल्ल्यास पचन नीट न झाल्याने पोटदुखी आणि पोटफुगीसारख्या समस्या निर्माण होतात. यासाठीच अन्न बारीक चावून खाणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अन्न बारीक चघळून खाता तेव्हा त्यात लाळ मिसळल्याने तुमच्या पोटात पाचक द्रव्य सोडली जातात. ज्यामुळे अन्नाचं योग्य प्रकारे पचन होवून त्याचं उर्जेत रुपांतर होतं आणि पचनाचा कोणताही त्रास होत नाही.

हे देखिल वाचा-

वजन कमी होण्यास मदत

घाईगडबडीत पदार्थ योग्यरित्या न चावता खाल्ल्याने त्याचं पचन न झाल्यास शरीरात फॅट्स साचू लागतात. ज्यामुळे वजन वाढू शकतं. वास्तविकपणे जेव्हा तुम्ही जेवण जेवत असता तेव्हा जवळपास तुमच्या मेंदूला तुमचं पोट भरल्याचे संकेत पोहचण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी लागतो. यामुळेच तुम्ही हळू हळू अन्न पदार्थ चघळून घाल्यास जास्त अन्न खाण्याची शक्यता कमी होते. या इलट गडबडीत अन्न खात असताना तुम्ही जास्त अन्न खाता.

ओरल हेल्द चांगली राहते

जेवण किंवा अन्न पदार्थ बारीक चघळून खाणं हे तोंडाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतं. जेव्हा तुम्ही अन्न चघळून घाता तेव्हा तोंडामध्ये जास्त लाळेची निर्मिती होते. लाळेमुळे तोंडातील बॅक्टेरीयाची समस्या दूर होते. तसचं हिरड्या सुजण्याची समस्या कमी करण्यासाठी देखील मदत होते.

पोषक द्रव शरीराला मिळतात

अन्न चांगलं बारीक करून किंवा चावून खाल्ल्याने त्यातील सर्व पोषक तत्व शरीराला मिळण्यास मदत होते. चघळण्याच्या क्रियेत पाचक एंजाइम पदार्थातील पोषक त्तत्व बाहेर काढण्यास मदत करतात. य़ा पोषक तत्वांचं शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतली जातात. शरीराला अन्न पदार्थातील सर्व पोषक त्तत्व मिळत असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर

अन्न योग्यरित्या चावून खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. तसंच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी अन्न बारीक करत चघळून खाणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT