प्रश्नोत्तर sakal
आरोग्य

प्रश्नोत्तर

गेली २-३ वर्षे मला सतत ॲसिडिटीची गोळी घ्यावी लागते. एखादा दिवस गोळी घेतली गेली नाही, तर लगेच पोटात दुखते, पोट फुगल्यासारखे वाटते, छातीवर दाब आल्यासारखे वाटते.

सकाळ वृत्तसेवा

गेली २-३ वर्षे मला सतत ॲसिडिटीची गोळी घ्यावी लागते. एखादा दिवस गोळी घेतली गेली नाही, तर लगेच पोटात दुखते, पोट फुगल्यासारखे वाटते, छातीवर दाब आल्यासारखे वाटते. तज्ज्ञांना दाखवले, तपासण्या केल्या पण काहीही फरक पडत नाही. रोज पोट साफ होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

- तन्मयी पाटील

उत्तर : पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी काही दिवस आपला संपूर्ण स्वयंपाक गाईच्या साजूक तुपात करावा, तेल संपूर्णपणे वर्ज्य करावे. रात्रीचे जेवण हलके असावे. शक्यतो सात-साडेसातपर्यंत रात्रीचे जेवण झालेले जास्त उत्तम. आहारात मुगाची डाळ, भात, तांदळाची-ज्वारीची-नाचणीची भाकरी, साळीच्या लाह्या नियमित ठेवण्याचा फायदा होईल. भाज्यांमध्ये खूप प्रमाणात तिखट घालणे वर्ज्य करावे. शक्यतो जिरे, आले, धणे, खोबरे, वेलची वगैरे मसाल्यांच्या रूपात जास्त वापरावे. रोज रात्री झोपताना संतुलन अविपत्तिकर चूर्ण वा सॅनकूल चूर्णासारखे चूर्ण नक्की घ्यावे. सकाळ-संध्याकाळ २-२ संतुलन पित्तशांती गोळ्या व जेवणानंतर संतुलन अन्नयोग गोळ्या घेण्याचा फायदा दिसू शकेल. दिवसातून २-३ वेळा संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल पोटावर हलक्या हाताने जिरवावे, यामुळे पचन सुधारते, गॅसेस कमी होतात व पोट दुखण्याचा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

माझ्या आठ वर्षांच्या मुलाला सतत डोळ्यांमध्ये लालसरपणा असण्याची व रांजणवाडी होण्याची प्रवृत्ती आहे. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी दिलेले ड्रॉप्स टाकले की तात्पुरते बरे वाटते, परत त्रास सुरू होतो. यासाठी काय करता येऊ शकेल ?

- पार्वती बावडेकर, कराड

उत्तर : शरीरात उष्णता वाढल्यास बऱ्याच लोकांना अशा प्रकारे रांजणवाडी होण्याचा त्रास होताना दिसतो. एवढेच नव्हे तर डोळ्यांत लालपणा, जळजळ जाणवू शकते. यासाठी रांजणवाडीची सुरुवात झाली की लगेच रक्तचंदन उगाळून रांजणवाडीवर अशा प्रकारे लावावे की ते डोळ्यांत जाणार नाही. तसेच दिवसातून १-२ वेळा गुलाबपाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवायला सुरुवात करावी. त्रिफळ्याच्या पाण्याने रोज डोळे धुण्याचा फायदा होऊ शकतो. बरोबरीने संतुलन पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने पादाभ्यंग करणे उत्तम राहील. काही दिवस मुलाला कूलसॅन सिरप नियमित द्यावे. तसे त्याचे रोज पाट साफ होते आहे की नाही याकडे लक्ष ठेवावे, ते होत नसल्यास संतुलन बाल हर्बल सिरप व सॅनकूल चूर्ण देण्याचा फायदा होऊ शकेल. डोळे खूप महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे डोळ्यांना होणाऱ्या त्रासाकडे शक्यतो दुर्लक्ष करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT