exercise sneeze sakal
आरोग्य

तर काय?

मी सध्या व्यायाम करणे सुरू केलेले आहे. व्यायाम सुरू केल्यापासून ताजेतवाने वाटण्याऐवजी माझे सांधे दुखायला लागलेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मी सध्या व्यायाम करणे सुरू केलेले आहे. व्यायाम सुरू केल्यापासून ताजेतवाने वाटण्याऐवजी माझे सांधे दुखायला लागलेले आहेत. मध्ये १-२ दिवस आराम करून पाहिला, परंतु सांधेदुखी कमी झाली नाही. व्यायाम करवत नाही. माझे वय ४० आहे. असा त्रास का होत असावा?

- श्री. विनय, मुंबई

शरीराला व्यायामाचीसुद्धा सवय व्हावी लागते. कधी तरी अति उत्साहामुळे लोक स्वतःच्या शरीरशक्तीचा विचार न करता एकदम व्यायाम सुरू करतात. आणि नंतर त्याचा त्रास होताना दिसतो. व्यायामाचा सराव हळूहळू करत आपली क्षमता वाढवायला पाहिजे. तसेच व्यायाम करत असताना स्वतःच्या शरीराच्या लवचिकतेचाही विचार करणे आवश्यक असते. कुठलाही व्यायाम करण्याआधी संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल संपूर्ण अंगाला लावल्याचा फायदा मिळू शकतो.

तसेच खाण्यामध्ये ताजे गाईचे दूध, घरचे लोणी, गाईचे साजूक तूप, खजूर, डिंकाचे लाडू वगैरेंचा समावेश असावा. व्यायामाबरोबर डाएट केल्यास अशा प्रकारचे त्रास वाढू शकतात. सांध्यांचे दुखणे कमी होण्यासाठी संतुलन शांती सिद्ध तेलासारखे तेल नियमित लावावे. मॅरोसॅन रसायन हे पुरुषांकरताही उत्तम असते. त्यामुळे तेही नियमित घेणे चांगले. हाडे मजबूत राहण्याकरता आत्मप्राशसारखे रसायनही उपयोगी पडू शकेल.

माझा नातू १९ वर्षांचा आहे. त्याला धुळीची ॲलर्जी आहे. धुळीच्या संपर्कात आला की शिंका सुरू होतात. सकाळी उठल्या उठल्या कमीत कमी १५-१६ शिंका येतात. त्याचे अंग सतत गरम लागते. काय करता येईल?

- श्रीमती मिनल, पुणे

प्रकृतीमध्ये उष्णता असल्यास अशा प्रकारे धुळीची ॲलर्जी किंवा सकाळच्या वेळी शिंका येण्याचा त्रास होऊ शकतो. असा त्रास कमी करण्यासाठी संतुलन पित्तशांतीसारख्या गोळ्या २-२ गोळ्या सकाळ-संध्याकाळ नियमित घ्याव्या. नाकात नस्यसॅन तूप घालावे. ॲलर्जीचा त्रास कमी होण्याच्या दृष्टीने मंजिष्ठासॅन गोळ्या घेण्याचा फायदा मिळू शकेल.

रोज रात्री झोपण्याआधी अविपत्तिकर चूर्ण घ्यावे, जेणेकरून शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत मिळेल. पचन व्यवस्थित होत नसल्यास आठवड्यातून कमीत कमी २-४ वेळा तरी संतुलन अन्नयोग गोळ्या घ्याव्या, त्यामुळेही पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CRPF जवानाची बायको अन् टोल कर्मचाऱ्यामध्ये जुंपली! एकमेकांच्या झिंज्या पकडून फ्रीस्टाईल हाणामारी

Health Tips : टॉयलेट सीटवर बसून टाईमपास करणं महागात पडेल, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा, सवय बदला नाहीतर...

Latest Maharashtra News Updates : विद्यार्थ्यांची मतदानासाठी जनजागृती

Solapur Travel Place : हिवाळ्यात फिरायला जायचं प्लॅन करताय, हे ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा

AUS vs PAK: ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानला 'गर्रगर्र...' फिरून धुलते; नंतर गोलंदाजांनी नाक घासायला लावले, बिच्चारे वाईट हरले

SCROLL FOR NEXT