Back pain trouble child Abdominal pain sakal
आरोग्य

तर काय?

सकाळ वृत्तसेवा

प्रश्‍न १ - माझे वय २४ वर्षे आहे. लग्न झाल्यापासून माझा पाच वेळा गर्भपात झाला आहे. सध्या मला कंबर दुखण्याचा प्रचंड त्रास होतो आहे. डॉक्टरांचा आयव्हीएफ करण्याचा सल्ला आहे, परंतु कंबरदुखीमुळे व अंग जड वाटत असल्यामुळे आयव्हीएफ करायला भीती वाटते. सतत थकवा जाणवत असतो. काय करावे ते कृपया सुचवावे.

- सौ. भिडे, बेलापूर

उत्तर - गर्भपातानंतर आयुर्वेदाने स्त्रीची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगितलेले आहे, अन्यथा शरीरात वाताचे असंतुलन होऊन पाठदुखी, कंबरदुखी वगैरे त्रास होताना दिसतात. त्यासाठी रोज पाठीवर संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासारखे तेल नियमितपणे जिरवावे. तसेच रोज रात्री झोपताना योनीभागी फेमिसॅन तेलाचा पिचू ठेवणे सुरू करावे. आठवड्यातून २-३ वेळा संतुलन शक्ती धुपासारख्या धुपाने धूपन करण्याचा फायदा होऊ शकेल. योनीपिचू व योनीधूप हे दोन्ही गर्भपातानंतर झालेले वाताचे असंतुलन कमी करायला मदत करतात.

शरीरातील वाताचे असंतुलन कमी करण्यासाठी दशमूलारिष्ट, दशमूळसॅन गोळ्या, संतुलन वातबल गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. थकवा कमी होण्यासाठी धात्री रसायन, कॅल्सिसॅन, आत्मप्राश वगैरे रसायने नियमितपणे घेणे सुरू करावे. एकूणच दुर्लक्ष न करता व्यवस्थित काळजी घेतली तर यातून बरे व्हायला मदत मिळेल. त्रास कमी झाल्यानंतर नैसर्गिक गर्भधारणेसाठी संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्स्पिरिअन्समार्फत वीर्यवृद्धीसाठी आहार-आचरणातून कशी मदत होऊ शकेल याचे नक्की मार्गदर्शन घ्यावे. शास्त्रोक्त संतुलन पंचकर्म करून नंतर उत्तरबस्ती करून घेण्याचाही उपयोग होईल.

प्रश्‍न २ - माझ्या मुलाचे वय १० वर्षे आहे. त्याला दर महिन्यात पोटदुखीचा त्रास होतो. त्याला तज्ज्ञांकडे दाखवले, सोनोग्राफीही करवली, पण कुठलेही निदान होत नाही. तो रात्री झोपेत दात खातो. हायपर ॲक्टिव्ह आहे. अभ्यासात त्याचे मन लागत नाही. यासाठी काय उपाय करता येईल ते सुचवावे.

- सुधीर इनामदार, अंबरनाथ

उत्तर - पोटात दुखणे, झोपेत दात खाणे, हायपर ॲक्टिव्ह असणे हे सहसा जंतांचा त्रास असल्याचे निदर्शक आहे. मुलाला रोज न चुकता जेवणानंतर विडंगारिष्टसारखे औषध ३-४ महिने द्यावे, तसेच विगंडसॅनसारखी गोळी सकाळ-संध्याकाळ सुरू करावी. जंक फूड, बाहेरचा आहार देणे तात्पुरते बंद करावे. चॉकलेट, चिप्स वगैरे पूर्णपणे बंद करणे उत्तम.

पचनाच्या दृष्टीने त्याला संतुलन बाल हर्बलसारखे सिरप नियमितपणे देणे चांगले. त्याची हायपर ॲक्टिव्हिटी कमी होण्याच्या दृष्टीने रोज रात्री न चुकता संतुलन ब्रह्मलीन तेलासारखे तेल टाळूवर नक्की लावावे. सॅन रिलॅक्स सिरप देण्याचा उपयोग होऊ शकेल. मुलांना दीपध्यान करवण्याचाही फायदा मिळू शकेल. बरोबरीने त्याला ॐकार गणेश सीडी नियमितपणे ऐकवावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT