Rahul Gandhi Fitness: Sakal
आरोग्य

Rahul Gandhi Fitness: राहुल गांधी निरोगी अन् तंदुरूस्त राहण्यासाठी फॉलो करतात 'असे' रूटीन

पुजा बोनकिले

Rahul Gandhi Fitness: काँग्रेस नेते राहूल गांधी यांचा आज ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. लोकसभा निवडणूकीपुर्वी त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यावेळी त्यांच्या फिटनेसचे कौतुक करण्यात आले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. त्यांच्या वाढिवसानिमित्त जाणून घेऊया त्याची दिनचर्या काय आहे आणि ते आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करतात.

राहुल गांधींना न थकता तासंतास भाषण करताना आपण अनेकदा पाहिले आहे. ते खूप उत्साही आहे आणि सक्रिय असतात. आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन अतिशय तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले. तो 54 वर्षांचा आहे पण तरीही त्याच्यात अद्भुत ऊर्जा आहे.

राहुल गांधी स्वत:ला शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो करतात हे जाणून घेऊया.

सकाळी लवकर उठतात

राहुल गांधी सकाळी लवकर उठतात. त्यांना सायकलिंग आणि जॉगिंग करायला आवडते. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी ते त्यांच्या दैनंदिन जीवनात याचा समावेश करतात. राहुल पहाटे साडेचार वाजता उठतात आणि वर्कआउटही करतात. ते कितीही व्यस्त असले तरी तो आपला दिनक्रम बदलत नाही. अगदी थंड वातावरणातही ते दररोज सकाळी लवकर उठतात आणि आपली दिनचर्या पाळतो.

वेळेत नाश्ता

राहूल गांधी सकाळी लवकर नाश्ता करतात. त्यानंतर ते पक्ष कार्यालयाच्या वेळेत आपल्या दैनंदिन कामासाठी निघतात. त्यांना दक्षिण भारतीय पदार्थ खूप आवडतात.

जेवण वेळेत घेतात

राहुल गांधी प्रत्येक गोष्ट वेळेनुसार करतात. मग तो नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण. त्याचे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. त्यांच्या जेवणात सॅलेडचा समावेश असतो.

झोपण्यापुर्वी करतात हे काम

राहुल गांधी यांना पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे. त्यामुळे ते झोपण्यापूर्वी पुस्तक वाचतात. ते रात्री खूप हलके जेवण घेतात आणि नंतर वेळेवर झोपतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT