Paneer Benefits esakal
आरोग्य

Paneer Benefits : ब्रेकफास्टमध्ये कच्चे पनीर खाताच दूर होतात हे आजार, शरीरही होतं मजबूत, वाचा फायदे

सकाळच्या नाश्त्यात पनीर सारखे हेल्दी पदार्थ खायला हवे

साक्षी राऊत

Paneer Benefits : दिवसाची सुरूवात हेल्दी ब्रेकफास्टने करायला हवी. कारण रात्री झोपल्यानंतर तुम्ही सकाळी ८-९ तासांच्या अंतरानंतर काहीतरी खात असता. त्यामुळे संपूर्ण दिवसासाठी तुम्हाला एनर्जी मिळते. तेव्हा सकाळच्या नाश्त्यात पनीर सारखे हेल्दी पदार्थ खायला हवे.

पनीरमध्ये प्रोटीन, फॅट, आयरन, कल्शियम आणि मॅग्नेशियम असते. जे GLP-1, PYY आणि CCK हार्मोन्स वाढवण्यास देखील मदत करते. हे हार्मोन्स शरीरासाठी खूप महत्वाचे असतात आणि पोट भरण्यास मदत करतात. जाणून घेऊया नाश्त्यात कच्चे पनीर खाण्याचे फायदे.

एनर्जीची कमतरता

पनीरमध्ये पोषण भरपूर प्रमाणात असतं. हे न्यूट्रिएंट्स वजन कंट्रोल करण्यासह तुम्हाला अॅक्टिव्ह ठेवण्यासही मदत करते. तुम्हा नाश्त्यात 150-200 ग्राम कच्चे पनीर खात हेल्दी राहू शकता. (Health)

कमकुवत हाडे

कॅल्शियम शरीरात भरपूर कामे करण्यास मदत करतात. हे हड्ड्यांसह दात आणि नखे मजबूत करण्यासही मदत करतात. पनीरमध्ये कॅल्शियमची चांगली मात्रा असते, जे हड्ड्यांचा कमकुवतपणा दूर करते.

प्रोटीनचा स्त्रोत

कच्च्या पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. यातील मायक्रोन्यूट्रीएंट मासपेशींना वाढवण्यास मदत करते. तुम्ही रोज पनीरचे सेवन करून मसल्स ग्रोथला तेज करू शकता.

वेट लॉस करण्यासही मदत होते

पनीर फक्त वजन कंट्रोलच करत नाही तर वजन कमी करण्यासही मदत करते. यात कार्ब्सची मात्रा कमी आणि पनीरची मात्रा जास्त असते. यामुळे तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहातं आणि तुम्ही अनहेल्दी खाण्यापासून दूर राहाता. (weight control)

कच्चे पनीर खाण्याचे फायदे

मधुमेहाच्या रूग्णांसाठी पनीर फार फायदेशीर असते. यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. जो मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर आहे. हाय बीपी कंट्रोल करण्यासाठीही ते खूप फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT