Cholesterol level: आपल्या रक्तामध्ये मेणासारखा पदार्थ असतो जो आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. या मेणयुक्त पदार्थाला कोलेस्टेरॉल म्हणतात. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. जेव्हा या कोलेस्टेरॉलचे प्रमाण रक्तात वाढते तेव्हा ते आपल्या मेंदू आणि हृदयाला रक्तपुरवठा करण्यास समस्या निर्माण करतात. यामुळे अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.
गेल्या काही वर्षात बदलती जीवनशैली आणि चुकीचे खाणपान, वाढता ताणतणाव आणि जास्त वेळ बसून काम करणे यामुळे महिला आणि पुरुष दोघांमध्येही कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पण वयानुसार आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी किती असावी हे जाणून घेऊया.
19 वर्षांच्या व्यक्तीचे कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे?
मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, 19 वर्षांपर्यंतच्या तरुणांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी 170mg/dl पेक्षा कमी असावी. यामध्ये, नॉन-एचडीएल 120 mg/dl पेक्षा कमी आणि एलडीएल 100 mg/dl पेक्षा कमी असावे. त्यामुळे एचडीएल 45 mg/dl पेक्षा जास्त असावे.
20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसाठी कोलेस्टेरॉलची पातळी किती असावी?
20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांच्या शरीरात एकूण कोलेस्ट्रॉल 125-200 mg/dl दरम्यान असावे. नॉन-एचडीएल पातळी 130 mg/dL पेक्षा कमी आणि एलडीएल पातळी 100 mg/dL पेक्षा कमी असावी. एचडीएल पातळी 40 mg/dL किंवा त्याहून अधिक असावी.
20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांचे कोलेस्टेरॉल किती असावे?
20 वर्षांवरील महिलांच्या शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉल 125-200 mg/dl दरम्यान असावे तर नॉन-एचडीएल पातळी 130 mg/dl पेक्षा कमी आणि एलडीएल पातळी 100 mg/dl पेक्षा कमी असावी. म्हणून एचडीएल पातळी 50 mg/dl किंवा त्याहून अधिक असावी.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर वजन कमी करावे.
यासाठी नियमितपे योगा, व्यायाम करावा.
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
आहारात साखर आणि मीठाचे सेवन कमी करावे.
जंक फुड आणि फास्ट फूड खाणे टाळावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.