Healthy Lifestyle  sakal
आरोग्य

Healthy Lifestyle : सावधान! मुलांमध्ये वाढतोय स्थूलपणा; 'ही' आहेत कारणे

लठ्ठपणामुळे त्वचेखाली अतिरिक्त चरबी वाढते. मुलांमध्ये स्थूलपणा वाढतो.

सकाळ डिजिटल टीम

Healthy Lifestyle : आई-वडील लठ्ठ असतील, तर मूलही तसेच वाढण्याची जास्त शक्यता असते. तेव्हा मुलाच्या लठ्ठपणाला आनुवंशिकता कारणीभूत असते. मात्र काही पालक आपली मुलं गुटगुटीत दिसतात, असा समज करून मुलांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करतात.

मुलांचे वजन, त्यांचे वय आणि उंचीनुसार असलेल्या वजनापेक्षा जास्त वजन वाढल्याचे दिसले आणि मुलाचा बीएमआय ३० च्यावर गेला की, मुलांमध्ये लठ्ठपणा आहे, हे पालकांनी समजून घ्यावे. लठ्ठपणामुळे त्वचेखाली अतिरिक्त चरबी वाढते. मुलांमध्ये स्थूलपणा वाढतो. (reasons of increasing children obesity )

जीवनशैली कारणीभूत

जंकफूड, मोबाईल, व्हिडीओ गेम यामुळे कमी शारीरिक हालचालीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो.

१० वर्षांवरील मुलांतील हा लठ्ठपणा वेळीच लक्षात आल्यास आहार किंवा व्यायामाच्या माध्यमातून तो नियंत्रित केला जातो; परंतु वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास किंवा आरोग्यास धोका निर्माण झाल्यास मात्र शस्त्रक्रिया करणे भाग असते.

आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात हाय कॅलरी फूड सेवनाचे प्रमाण वाढले. यात पौष्टिक घटक नसतात.

हल्ली मुले टीव्ही आणि मोबाइलमध्ये गुंतली आहेत. मैदानी खेळ हरवले आहेत.

शारीरिक क्रियांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. हॉर्मोनल समस्याही यास कारणीभूत आहे.

काय होतो परिणाम?

  • हाडांमध्ये विकृती येणे अथवा फ्रॅक्चर होणे

  • अति वजनामुळे श्वसनक्रियेवर परिणाम, दमा होण्याची शक्यता

  • लठ्ठपणामुळे झोपेच्या समस्या, ‘स्लीप अॅप्निया’ ची भीती

  • लठ्ठ टीनएज मुलांमध्ये हायपरटेंशनची समस्या

  • मुलांना गॉलस्टोन्सची समस्या निर्माण होण्याची शक्यता

  • मुलांमध्ये कारण नसताना अचानक डोकेदुखी सुरू होते

  • लठ्ठपणातून चरबी वाढते, यकृताच्या समस्या निर्माण होतात

  • अतिरिक्त चरबीमुळे ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण सुटते

  • टाइप-२ मधुमेहाची समस्या निर्माण होते

  • किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या येतात

मैदानी खेळांसह, पोहणे आणि सायकलिंगसारख्या व्यायामाची गोडी मुलांमध्ये निर्माण करावी. याशिवाय फास्ट फूड व आहारावर नियंत्रण पाहिजे. शीतपेय मुलांपासून दूर ठेवावे. आहार आणि निद्रा यांचा समतोल पालकांनी जपावा. हॉर्मोन्समुळे लठ्ठपणा वाढत असेल, तर तातडीने एंडोक्रिनोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. लठ्ठपणा हा एक विकार म्हणून पालकांनी त्याकडे बघावे.

-डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT