infertility  google
आरोग्य

Infertility Reasons : या कारणांमुळे येऊ शकते वंध्यत्व

थायरॉईडच्या समस्या देखील मासिक पाळीवर परिणाम करू शकतात ज्यामुळे वंध्यत्व येते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशात वंध्यत्वाची प्रकरणे चिंताजनक वेगाने वाढत आहेत. प्रजनन प्रणाली संबंधीत समस्यांमुळे अनेक जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या दिसून येते. १२ महिन्यांच्या नियमित संभोगानंतरही ज्या जोडप्यांना गर्भधारणा होऊ शकत नाहीत त्यास वंध्यत्व असे म्हणतात.

असे कोणते घटक आहेत जे एखाद्याच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात ? याविषयी सखोल माहिती या लेखाच्या माध्यमातून देत आहेत नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. करिश्मा डाफळे. (reasons of infertility in men and women)

महिलांमधील वंध्यत्वाची कारणे

• पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), हायपरप्रोलॅक्टिनेमिया यांसारख्या ओव्हुलेशन विकारांमुळे खूप जास्त प्रोलॅक्टिन तयार होते. हे आईच्या दुधाच्या उत्पादनास मदत करणारे हार्मोन आहे आणि ओव्हुलेशन प्रक्रियेस अडथळा आणतात.

याशिवाय, थायरॉईडच्या समस्या देखील मासिक पाळीवर परिणाम करू शकतात ज्यामुळे वंध्यत्व येते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी देखील या समस्येस कारणीभूत ठरतात.

• गर्भाशय ग्रीवाच्या समस्या, गर्भाशयातील पॉलीप्स आणि गर्भाशयाच्या भिंतीमध्ये कर्करोग नसलेल्या (सौम्य) गाठी (गर्भाशयातील फायब्रॉइड्स) वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात कारण त्यामुळे फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होऊ शकतात आणि फलित अंडी गर्भाशयात रोपण होण्यास अडथळे येऊ शकतात आणि गर्भधारणेत अडचणी येतात.

• फॅलोपियन ट्यूबचे नुकसान किंवा ट्युब ब्लॅाक झाल्याने तसेच पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज (पीआयडी) मुळे फॅलोपियन ट्यूब (सॅल्पिंगायटिस) मुळे वंध्यत्वाची समस्या उद्भवते. पीआयडी हा लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय), एंडोमेट्रिओसिसमुळे दिसून येतो.

• एंडोमेट्रिओसिस हे अंडाशय, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबच्या कार्यावर परिणाम करते आणि त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते.

• अकाली रजोनिवृत्ती - जेव्हा अंडाशय काम करत नाही आणि मासिक पाळी ४०व्या वर्षी संपते तेव्हा देखील वंध्यत्व येऊ शकते.

• रेडिएशन आणि केमोथेरपीसह कर्करोग आणि त्याचे उपचार प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात.

पुरुष वंध्यत्वाची कारणे

• मधुमेह, लठ्ठपणा किंवा क्लॅमिडीया, गोनोरिया, गालगुंड किंवा एचआयव्ही सारख्या संसर्गामुळे शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये येणारा अडथळा वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतो.

• सिस्टिक फायब्रोसिस सारखे काही अनुवांशिक रोग, अंडकोषातील अडथळे, जनुकीय समस्या किंवा पुनरुत्पादक अवयव योग्यरित्या कार्य करत नसल्यामुळे वंध्यत्व येऊ शकते.

• कीटकनाशके, रसायने, धुम्रपान, अल्कोहोल, ड्रग्स, स्टेरॉईड्स आणि काही औषधांचा अतिरेकी संपर्क प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतो. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की सौना किंवा हॅाट टब हे शरीराचे तापमान वाढवू शकतात आणि शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम करू शकतात ज्यामुळे वंध्यत्व येते.

रेडिएशन, केमोथेरपी, कमी वजन आणि अल्कोहोलचा वापर हे देखील वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात. प्रत्येक जोडप्याने त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आणि वंध्यत्वाशी लढा देण्यासाठी आणि यशस्वीपणे गर्भधारणेसाठी उपचार जाणून घेण्यासाठी प्रजनन सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT