Rehabilitation sakal
आरोग्य

Rehabilitation : हुक्क्याचे घातक ‘वलय’; लढा व्यसनमुक्तीचा

हुक्क्यातून ओढले गेलेले निकोटिन तंबाखूच्या आहारी जाण्यास पुरेसे ठरते. हुक्क्याच्या धुरात अतिशय घातक विषारी पदार्थ असतात. गांजा हेही एक प्रकारचे व्यसन आहे.

सकाळ वृत्तसेवा

हुक्क्यातून ओढले गेलेले निकोटिन तंबाखूच्या आहारी जाण्यास पुरेसे ठरते. हुक्क्याच्या धुरात अतिशय घातक विषारी पदार्थ असतात. गांजा हेही एक प्रकारचे व्यसन आहे. जेव्हा नशेसाठी त्याचा वापर केला जातो, तेव्हा त्याचे खूप दुष्परिणाम होत असतात. १८ ते २५ वयोगटांतील युवक व युवती गांजाच्या अधीन जात आहेत. त्यांना व्यसनांपासून दूर करण्याचे आव्हान मोठे आहे.

अनुया चाबुकस्वार व अविनाश चाबुकस्वार

भारताच्या विविध क्षेत्रांत होत असलेल्या प्रगतीमुळे भारत महासत्ता बनू पाहात आहे. जगातील  तरुणांची संख्याही भारतात अधिक आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि तरुणाईच्या प्रयत्नाने प्रगती नक्कीच गती पकडते आहे. पण याला गालबोट लावणारी गोष्ट म्हणजे तरुणाईत वाढणारी व्यसनाधीनता.

आज भारतात दर आठ सेकंदाला एक मृत्यू व्यसनाधीनतेमुळे होतो आहे. एका सर्वेक्षणानुसार दररोज पाच हजार विद्यार्थी नव्याने व्यसनाला सुरुवात करतात आणि कालांतराने त्यातील ५० टक्के मुलांचा मृत्यू त्यामुळेच होतो. व्यसनाधीनतेमुळे फक्त शरीराचेच नुकसान होते असे नाही तर नीती मूल्यांचाही ऱ्हास होतो. व्यसनाधीन व्यक्ती फार काळ व्यसनापासून दूर राहू शकत नाही. पैसे अपुरे पडू लागले की, प्रथम घरात व नंतर बाहेर छोट्या-मोठ्या चोऱ्या करायला लागतात, कधी अपहरण, खून यांसारखे मोठे गुन्हेही, मग शिक्षा अथवा रिमांड होम. आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो, व्यसनांच्या विळख्यातून बाहेर पडावे वाटते; पण त्याला खूप उशीर झालेला असतो. म्हणून वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

कॉफीशॉपच्या नावाखाली...

कोणतेही व्यसन हे वाईटच; पण काही व्यसनांना वलय मिळतेय आणि ते किती वाईट हे कळत नाही. त्यापैकी एक म्हणजे हुक्का. आजकाल पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कॉफीशॉपच्या नावाखाली हुक्का पार्लर चालविले जातात. कॉलेजमध्ये जाणारे तरुण कॉफी पिण्यासाठी जातात आणि हुक्क्याकडे आकर्षित होतात. स्टाइल आणि वेगवेगळे वास, स्वाद यांना भुलून फसतात. शरीरासाठी हुक्का घातक नाही, त्यामध्ये तंबाखू नसते किंवा हुक्का पाइपमधून ओढलेली तंबाखू पाण्यातून विषारी पदार्थ गाळून ओढली जाते, असा समज करून दिला जातो. पण  हे धादांत खोटे आहे. हुक्क्यातून ओढले गेलेले निकोटिन तंबाखूच्या आहारी जाण्यास पुरेसे ठरते.

हुक्क्याच्या धुरात अतिशय घातक विषारी पदार्थ असतात. उदा. डांबर, कार्बन मोनॉक्साईड, जडधातू आणि काही कॅन्सरजनक द्रव्ये. अर्धा ते एक तास हुक्का ओढला तर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, हुक्का ओढणाऱ्या एका सेशनमध्ये साधारणपणे ६० ते १०० सिगारेट सेवनाइतके निकोटिन शरीरात घेतो. हुक्का पार्लरमधील गर्दीत दुसऱ्याच्या उच्छवासातून  हुंगल्या  गेलेल्या निकोटिनचा वाढीव धोका लक्षणीय असतो. तसेच दुसऱ्याने वापरलेला पाइप आपल्या तोंडाने वापरल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढतो.

गांजा म्हणजे धोक्याची घंटा

हुक्क्याप्रमाणेच  गांजा हेही एक प्रकारचे व्यसन आहे. कित्येक औषधांमध्येही त्याचा अत्यल्प प्रमाणात वापर होतो. पण, जेव्हा नशेसाठी त्याचा वापर केला जातो, तेव्हा त्याचे खूप दुष्परिणाम असतात. गांजाची नशा करणाऱ्यांची संख्या खूप वाढत आहे. १८ ते २५ या वयोगटांतील युवक व युवतीही त्याच्या अधीन होत आहेत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या तरुणांना गांजाचे सेवन करण्यास काही वावगे आहे, असे अजिबात वाटत नाही आणि ही एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे. अकरावी इयत्तेच्या एक प्राचार्य सांगत होत्या की, ‘समोर उभी राहणारी मुले ही महाविद्यालयात येतानाच नशा करून आलेली असतात, काही विचारायला जावे तर उर्मट उत्तरे देतात. पालकांनी सजग राहिले पाहिजे. आपला पाल्य यात अडकलेला नाही ना, याची खात्री करून घेतली पाहिजे. पाच-सहाच्या संख्येने संध्याकाळी उशिरा वा रात्री एकत्र जमणारी मुले ही नक्की काय करतात? हे पालकांना माहीत

असायलाच हवे. गांजाचे व्यसन  समजेपर्यंत वर्षाचा कालावधी गेला तर खूप उशीर झालेला असतो. त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी लागणारा खर्च, वेळ व मनस्ताप खूप वाढतो. 

गांजाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

१) मेंदूची क्षमता कायमस्वरूपी कमी होते. मेंदूमध्ये असणारे आयक्यूचे आठ पॉइंट्स, यांची क्षमता संपते.

२) मानसिक स्वास्थ्य : गांजाच्या सेवनामुळे नैराश्य, सतत काळजी वाटणे, आत्महत्येचे विचार वाढीस लागू शकतात.

३) ॲथलेटिक कामगिरी : गांजामुळे मुलांचा वेळ आणि हालचाल यांचा समन्वय कमी होतो. 

४) गाडी चालवणे : गांजाच्या प्रभावाखाली गाडी चालविणाऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता वाढते. 

५) गर्भधारणेवर परिणाम : मुलींनी गांजाचे सेवन केल्यास गर्भधारणा न होणे किंवा बाळाच्या आरोग्यावर व त्याच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो.

६) दैनंदिन जीवनात गांजाच्या वापराने नातेसंबंधांवर परिणाम होतो. शैक्षणिक कारकिर्दीमध्ये यश कमी होते आणि आयुष्यातील आनंद उपभोगण्याची क्षमता कमी होते. आतापर्यंत जे संशोधन झाले आहे, त्यामध्ये असे आढळले आहे की, १८ वर्षांखालील सहा मुले गांजाचे सेवन करू लागली तर त्यातील एक व्यसनाधीन होऊन त्यातून बाहेर येऊ शकत नाही. (प्रौढांमध्ये हे प्रमाण १०:१ असे आहे.) तेव्हा सर्वांनीच गांजा आणि हुक्का या व्यसनांपासून चार हात दूर राहणेच योग्य आहे.

(लेखक पेस ग्रुप, पुणेचे विश्वस्त आहेत.)

पेस ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क :

९८५०८८८२९०/ ९८९०६०६९९०

paceantiaddiction@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT