loneliness sakal
आरोग्य

एकटेपणाबाबतच्या अस्वस्थतेवर उपाय

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

सेपरेशन अँक्झायटी डिसॉर्डरची लक्षणं आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता त्याची कारणं आणि उपाययोजना बघूया.

सर्वसाधारण कारणे

१. आई-वडिलांपैकी कोणाला अस्वस्थतेचा आजार असेल, तर मुलांमध्ये अशा प्रकारची डिसॉर्डर असू शकते.

२. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पाळीव प्राण्याचा मृत्यू यामुळे थोड्या मोठ्या मुलांमध्ये ही डिसॉर्डर उचल घेऊ शकते.

३. शाळाबदल, हॉस्पिटलमध्ये राहावं लागणं अशा पद्धतीच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे डिसॉर्डर उचल घेऊ शकते.

४. घरातील अस्वस्थ वातावरण - विशेषत: पालकांचे विकोपाला गेलेले वाद आणि भांडणं

५. पालकांचं ओव्हर-प्रोटेक्टिव्ह असणं हेही कारण ठरू शकतं.

उपचार

औषधोपचाराबरोबरच तज्ज्ञांबरोबर थेरपी सेशन्स महत्त्वाचे असतात. मुलांबरोबरच पालकांचं समुपदेशन आवश्यक ठरतं. शाळा व्यवस्थापनाचं सहकार्य महत्त्वाचं ठरतं. उपचाराचा भाग असलेली प्ले थेरपी आणि स्कूल बेस्ड समुपदेशनही उपयोगी ठरतं. पालकांच्या वागणुकीमध्ये काही सुधारणाही, आवश्यक ठरल्यास थेरपी सेशन दरम्यान सुचवल्या जातात.

पालकांसाठी महत्वाच्या टिप्स

१. सेपरेशन अँक्झायटी डिसॉर्डरविषयी संपूर्ण शास्त्रीय माहिती करून घ्यावी.

२. हळूहळू म्हणजे थोड्या थोड्या अवधीसाठी एकटं राहण्याची, सेपरेशनची सवय मुलांना लाववी. अगदी लहान बाळांना खूप भूक वा तहान लागली, की anxiety जाणवू शकते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत feeding झाल्यावर हा थोडा वेळ एकटं ठेवण्याचा अवधी असावा.

३. दूर जाताना लहान मुलांना गुड बाय करणं, कीस करणं, मी लगेच परत येतेय अशी वाक्य म्हणणं अशा गोष्टींची सवय करावी.

४. थोड्या मोठ्या मुलांबरोबर प्रेमानं संवाद साधावा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आम्ही जवळ नसलो तरी सुरक्षित असतो आणि लवकरच भेटतोच अशी खात्री द्यावी.

५. शाळेत जायला सुरवात केलेल्या मुलांच्या बाबतीत शाळेत सोडताना, ग्राउंडला सोडताना हा anxiety चा, transition चा point येणार आहे हे लक्षात घेऊन मनाची तयारी ठेवावी. म्हणजेच अतिशय शांत राहावं. स्वत: अजिबात पॅनिक होऊ नये.

६. जी मुलं या प्रॉब्लेममुळे शाळेत जात नाहीत, अशांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. मुलांना सोशल ॲक्टिविटीमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं.

शाळांसाठी टिप्स

ज्या मुलांना अशा anxiety चा प्रॉब्लेम आहे, अशांसाठी वेगळी योजना बनवावी. त्यांच्या recovery साठी ती उपयुक्त ठरेल. उदा. त्यांना सुरवातीला उशिरा येण्याची सवलत देणे (सवय होईपर्यंत); सुरवातीला थोडा वेळ शाळेत येणे (सवय होईपर्यंत); अशा मुलांना सुरक्षित वाटेल अशा वर्गात किंवा जागेत काही काळ बसण्यास परवानगी देणे; अशा मुलांना सुरवातीला घरी संपर्क करण्याची परवानगी देणे; शिक्षक आणि शाळेच्या समुपदेशकाने त्यांच्या संपर्कात राहणे व त्यांचा आत्मविश्वास वाढेल असा प्रयत्न करणे; मुलांना प्रोत्साहनपर शाबासकी देणे. हे सगळं करायचं आहे ते मूल धीट होईल, शाळेच्या वातावरणाशी समरस होईल व त्याचा पालकांपासून दूर, शाळेच्या वेळेत एकटं राहण्याविषयीचा विश्वास वाढेल यासाठी.

सेपरेशन anxiety वर मात करण्यासाठी थोडक्यात पुढील गोष्टी घडायला हव्यात : आई-बाबा नसतानाही मुलांना घरी सुरक्षित वाटायला हवं, आई-बाबांबरोबरच त्यांचा इतर परिचित व्यक्तींवर विश्वास बसायला हवा आणि मुख्य म्हणजे आई-बाबा काही काळासाठी दूर गेले, तरी काही अवधीनंतर ते निश्चित भेटणार आहेत, हा विश्वास त्यांच्यात रुजायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT