Child Care Tips Sakal
आरोग्य

Child Care Tips: लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या 'या' समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात मधुमेहाची लक्षणे

Child Care Tips: लहान मुलांमध्ये पुढील समस्या दिसल्यास दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पुजा बोनकिले

report diabetes signs and symptoms in child how to take care

आजकाल मधुमेहाची समस्या सामान्य झाली आहे. अनेक लोक मधुमेह आजाराला बळी पडत आहेत. हा आजार आता प्रौढांबरोबरच लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. आता मुलांमध्ये मधुमेह आजार वाढत आहे. हे 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अधिक सामान्य आहे. टाईप-1 मधुमेहाचा धोका मुलांना जास्त असतो. मुलांमध्ये मधुमेहाची कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.

  • सारखी लघवी येणे

वारंवार लघवी होणे हे मधुमेह आजाराचा सर्वात मोठे लक्षण आहे. मधुमेहाच्या रुग्णाला खूप तहान लागते, त्यामुळे किडनी जास्त लघवी तयार करते आणि वारंवार लघवीला जावे लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. जर मुल भरपूर पाणी पीत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • थकवा जाणवणे

रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. कोणतेही काम न करता सारखा थकवा जाणवत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. मुलांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. जर मूल सतत थकले असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • पलंगावर लघवी करणे

अनेक मुलं बेडवर लघवी करतात. जर तुमचे मूलं हुशार आणि मोठे झाल्यानंतरही बेडवर लघवी करत असेल तर ते टाइप 1 मधुमेहाचे लक्षण असू शकते. हाय शुगरमुळे वारंवार लघवीला जाण्याची समस्या निर्माण होते.

  • इतर लक्षणे

वरील लक्षणांसोबतच मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अनेक लक्षणे दिसतात. जास्त भूक लागणे, चिडचिड होणे आणि जखम लवकर बरी न होणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत.

अशी काळजी घ्या

  • वरीलपैकी कोणतीही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास रक्तातील साखरेची पातळी तपासावी.

  • पालकांपैकी कोणाला मधुमेह असेल तर बाळाच्या जन्मानंतर मधुमेहाची तपासणी करावी.

  • मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा आणि गोड पदार्थ खाणे टाळा.

  • नियमितपणे योगा करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Beed Voter Assembly Polls : तीन हजार मतदारांची एकाही उमेदवाराला पसंती नाही

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT