HEALTH: ऑक्टोबर महिन्याचा शेवट सुरू असून आता थंडीच्या दिवसांना सुरूवात झाल्याचे जाणवते. थंडीच्या दिवसांत अनेकांचे चेहरे आणि संपूर्ण स्किन ड्राय होते. अनेकांजण सतत मॉश्चुरायजर लाऊनही त्यांची स्कीन कोरडी पडत असल्याचे जाणवते. हे सगळं तुमच्या शरीरातील विटॅमिनच्या कमतरतेमुळे जाणवते. तेव्हा तुम्ही यावर काही उपाय केल्यास तुमची ड्राय स्कीन नॉर्मल राहाण्यात मदत होईल.
या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे तुमची स्किन होते ड्राय
विटॅमिन सी
त्वचेसाठी विटॅमिन सी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. याच्या कमतरतेमुळे तुमची स्किन ड्राय होत असते. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार तुमच्या स्किनला प्रदुशणापासून वाचवण्यातही विटॅमिन सी उपयुक्त आहे. त्यामुळे याच्या कमतरतने स्किनच्या समस्या निर्माण होतात.
विटॅमिन ई
एँटी एजिंगच्या समस्येमध्ये विटॅमिन सी ची मुख्य भूमिका असते. याची शरीरात कमतरता झाल्यास तुमची स्किन हळू हळू डल दिसायला लागते. ज्यामुळे कमी वयातच तुम्ही जास्त वयाचे दिसता.
विटॅमिन डी
विटॅमिन डी ला शरीराचा उर्जा स्त्रोत मानला जातो. याच्या कमतरतेमुळे शरीरातील हड्डया कमकुवत होतात. याशिवाय विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीराच्या इम्युनिटी सिस्टिमवरही प्रभाव पडतो. सोबतच ड्रायनेसच्या समस्याही निर्माण होतात.
विटॅमिन बी
विटॅमिन बी च्या कमतरतेने पिंपल्स, ओठ फाटणे असे त्वचेसंबंधित आजार वाढतात. हे आजार घालवण्यासाठी हिरव्या भाज्या, अंकुरित कडधान्ये यांचा समावेश डाएटमध्ये करून घ्यावा.
ड्राय स्किनसाठी या काही टीप्स फॉलो करा
ड्राय स्किन घालवण्यासाठी तुमच्या खाण्यापिण्याबरोबरच तुमच्या स्किन लोशनकडेही विशेष लक्ष द्या. तुमच्या खाण्यापिण्यात विटॅमिन ई, विटॅमिन बी, विटॅमिन सी यांचा समावेश असू द्या. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये १ ते २ दोन तास उन्हात नक्की बसा. सूर्यप्रकाशात मोठ्याप्रमाणात विटॅमिन डी असते. थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाशात बसल्याने त्वचेसंबंधित समस्या दूर होतात. (Health Tips)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.