women Health Care Sakal
आरोग्य

Women Health: रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्‍ये एएससीव्‍हीडीचा धोका वाढतो; जाणून घ्या तज्ञांचे मत

पुजा बोनकिले

Women Health Care: सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेक लोक आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हृदयासंबंधित आजारांचा धोका पुरूषांसह महिलांना देखील होतो. भारतातील महिलांमध्‍ये हृदयविषयक आजारांचे प्रमाण ३ टक्‍के ते १३ टक्‍के आणि गेल्‍या दोन दशकांमध्‍ये जवळपास ३०० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

खरंतर, नुकतेच झालेल्या संशोधनांमधून निदर्शनास आले की भारतातील महिलांमध्‍ये हार्ट फेल्युअरचे प्रमाण वर्ष २००० पासून २०१५ पर्यंत दुप्‍पटीहून अधिक झाले आहे. ही वाढती आकडेवारी पाहता विशिष्‍ट आजारांकडे, विशेषत: एथेरोस्क्‍लेरोटिक कार्डियोव्‍हॅस्‍कुलर डिसीज (एएससीव्‍हीडी) सारख्‍या चिंताजनक स्थितींकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. एएससीव्‍हीडीमध्‍ये पाल्‍क तयार झाल्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या अरूंद व कडक होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका व स्‍ट्रोकचा धोका वाढतो.

मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलच्‍या कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. झाकिया खान म्‍हणाल्‍या, “कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांची तपासणी केल्‍याने उच्‍च एलडीएल-सीचे स्‍पष्‍टपणे निदान होण्‍यास मदत होते. महिलांनी वयाच्‍या १८ व्‍या वर्षापासून कोलेस्‍ट्रॉलची तपासणी सुरू केली पाहिजे.

मी तपासणी केलेल्‍या जवळपास ३० टक्‍के रूग्‍णांमध्‍ये एलडीएल-सी पातळ्या अधिक प्रमाणात असल्‍याचे दिसून आले आहे, ज्‍या एएससीव्‍हीडीप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देतात. सुरूवातीला भेट दिलेल्‍या अनेक महिलांना त्‍यांच्‍या स्थितीबाबत माहित नाही. हार्मोनलमधील चढ-उतार आणि जीवनशैलीसंबंधित निर्णयांमुळे कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांमध्‍ये वाढ होऊ शकते. ज्‍यांची योग्‍य वेळी तपासणी केली नाही तर एएससीव्‍हीडी सारखे कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजार होऊ शकतात.

पेरिमेनोपॉझल कालावधी, रजोनिवृत्तीच्‍या सुरूवाती दरम्‍यान संक्रमण एएससीव्‍हीडीचा धोका वाढवतात. डायबेटिस मेलिटस आणि उच्‍च रक्‍तदाब यासारख्‍या कोमोर्बिडीटीज असल्‍यास हा धोका अधिक वाढतो. महिलांसाठी इतर समकालीन जोखीम घटक आहेत. पीसीओडी (पॉलिसायस्टिक ओव्‍हरी डिसीज), प्री-एक्‍लॅम्प्सिया, ओरल कॉन्‍ट्रासेप्टिव्‍ह गोळ्यांचा वापर आणि क्रोनिक ऑटोइम्‍यून आर्थिरायटीस.

जोखीम घटक कमी करण्‍यासाठी आणि वेळेवर उपचार सुरू करण्‍यासाठी लवकर तपासणी व नियमित लिपिड प्रोफाइल तपासण्‍या आवश्‍यक आहेत. प्रत्‍येक रूग्‍णाला त्‍यांच्‍या अद्वितीय एलडीएल-सी लक्ष्‍यांवर आधारित वैयक्तिकृत प्रतिबंध योजनांची गरज आहे. सक्रिय राहिल्‍याने हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍याची खात्री मिळते.''

महिलांमध्‍ये एएससीव्‍हीडीचा प्रभाव

संशोधनांमधून निदर्शनास येते की लक्षणे, जोखीम घटक व निष्‍पतींसंदर्भात एएससीव्‍हीडीचा महिलांवर विभिन्‍न प्रकारे परिणाम होतो. महिलांच्‍या जीवनाच्‍या उत्तरार्धात सामान्‍यत: रजोनि‍वृत्तीनंतर एएससीव्‍हीडी होतो आणि थकवा, श्‍वास घेण्‍यास त्रास होणे किंवा जबडा, मान, पाठ किंवा पोटामध्‍ये अस्‍वस्‍थता अशी लक्षणे जाणवू शकतात. या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते किंवा त्‍याबाबत चुकीचा अर्थ लावला जातो. ज्‍यामुळे निदान व उपचारास विलंब होतो.

पुरूष व महिलांना एएससीव्‍हीडी जोखीम घटकांचा समान धोका आहे. जसे उच्‍च कोलेस्‍ट्रॉल, उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह व धुम्रपान. महिलांना गर्भधारणा-संबंधित स्थिती (उदा. गॅस्‍टेशनल डायबेटिस, प्री-एक्‍लॅम्प्सिया) आणि हार्मोनल इन्‍फ्लूएन्‍सेस् (उदा. पॉलिसायस्टिक ओव्‍हरी सिंड्रोम, रजोनिवृत्ती) अशा आजारांचा अतिरिक्‍त धोका असतो. वाढत्‍या वयासह महिलांमध्‍ये एएससीव्‍हीडी होण्‍याचा धोका वाढतो, यामागील कारण म्‍हणजे रजोनिवृत्तीमुळे एस्‍ट्रोजन सारख्‍या हार्मोन पातळ्यांमध्‍ये घट होणे.

एएससीव्‍हीडी आणि कोलेस्ट्रॉल यांच्यामधील संबंध

एएससीव्‍हीडी हा दीर्घकालीन आजार आहे. रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये कोलेस्‍ट्रॉल निर्माण होते. काळासह रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये कोलेस्‍ट्रॉल प्‍लाक निर्माण झाल्‍यामुळे रक्तवाहिन्‍या अरूंद व कडक होतात. प्‍लाकमध्‍ये वाढ होत राहिल्‍यास हृदयविकाराचा धोका व स्‍ट्रोक्‍स यांसारखे विविध गंभीर आरोग्‍यविषयक आजार होऊ शकतात.

गुड व बॅड कोलेस्ट्रॉलमधील फरक काय?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्‍ट्रॉल महत्त्वाचे आहे. पण त्‍यामधील असंतुलन घातक ठरू शकते. ‘बॅड' कोलेस्‍ट्रॉल म्‍हणून ओळखले जाणारे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्‍ट्रॉल रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये प्‍लाक निर्माण करण्‍याला साह्य करत एएससीव्‍हीडी होण्‍यास कारणीभूत ठरू शकते. याउलट, ‘गुड' कोलेस्‍ट्रॉल म्‍हणून ओळखले जाणारे हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) कोलेस्‍ट्रॉल रक्‍तप्रवाहामधील एलडीएल कोलेस्‍ट्रॉल दूर करण्‍यामध्‍ये मदत करते. यामुळे रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये प्‍लाक निर्माण होण्‍याचा धोका कमी होतो.

महिलांच्या हृदयाच्या आरोग्‍यामध्‍ये एलडीएल कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांचे महत्त्व

एलडीएल कोलेस्‍ट्रॉल एएससीव्‍हीडी होण्‍यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावते. ज्‍यामुळे महिलांच्‍या हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नियमित लिपिड प्रोफाइल चाचण्‍या आणि कोलेस्‍ट्रॉल मॉनिटरिंगच्‍या माध्‍यमातून एलडीएल कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांची तपासणी या जोखीमेचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आवश्‍यक आहे.

डॉक्‍टरांसोबत संवाद साधणे महत्त्वाचे

महिलांमध्‍ये एएससीव्‍हीडीचे विविध जोखीम घटक आणि प्रकटीकरण पाहता उपचारासाठी वन-साइज-फिट्स-ऑल अप्रोच पुरेसा नाही. तुमच्या डॉक्टरांसोबत याबाबत चर्चा करावी. तुमचा प्रजनन इतिहास, हार्मोनल स्थिती, जीवनशैली आणि कोणत्याही अनुवांशिक पूर्वस्थितीबाबत चरेचा करावी. वैयक्तिकृत एलडीएल कोलेस्‍ट्रॉल लक्ष्‍य स्‍थापित करण्‍यासाठी सहयोगाने काम करत तुम्‍ही आणि तुमचे डॉक्‍टर तुमच्‍या अद्वितीय हेल्‍थ प्रोफाइलनुसार प्रतिबंध योजना आखू शकता.

हृदयाचे आरोग्‍य निरोगी ठेवण्यासाठी राहण्‍यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज आहे, नियमित मॉनिटरिंग, वैयक्तिक केअर योजना आणि प्रभावी डॉक्‍टर-रूग्‍ण संवादाच्‍या माध्‍यमातून कोलेस्‍ट्रॉल व्‍यवस्‍थापनाला प्राधान्‍य दिले पाहिजे. एलडीएल कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांबाबत जाणून घेऊन त्यावर उपचार सुरू करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT