Don'ts In Weight Loss Journey esakal
आरोग्य

Don'ts In Weight Loss Journey : वेटलॉस जर्नीत या 5 चुका टाळा, ऋजुता दिवेकरने दिला सावधगिरीचा इशारा

Weight Loss Mistakes : वजन कमी करण्याच्या नादात बऱ्याचदा लहान मोठ्या चुका होत असतात.

धनश्री भावसार-बगाडे

Rujuta Diwekar Tips In Marathi :

वजन कमी करण्यासाठी मेहनत लागते, दृढ निश्चयी पण व्हावे लागते. बऱ्याचदा लोक वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात पण लहान लहान चुका त्यांच्या फिटनेसमध्ये मोठी अडचण निर्माण करतात. अशात त्या चुका सुधारणे आवश्यक असते.

याविषयी सेलिब्रीटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने नुकतच इंस्टाग्राम अकाउंटवर याच चुकांविषयी सांगितले आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कोणत्या गोष्टी लक्षात असायला हव्यात.

Don'ts In Weight Loss Journey

मॉन्सुन डाएट

ऋजुता दिवेकर नेहमीच आपल्या अकाउंटवरून वेगवेगळ्या टिप्स शेअर करत असतात. अशातच पावसाळ्या आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय खावे या विषयी सांगताना त्या म्हणाल्या, पावसाळ्यात आठवड्यातून २, ३ वेळा भूईमुगाच्या शेंगा, डाळी, मका, सूरण, अरबीची भाजी, काकडी आणि भोपळा इत्यादी खावे. राजगीरा खाण्याचाही सल्ला त्यांनी दिला.

Don'ts In Weight Loss Journey

या पद्धतीने कमी होऊ शकते वजन

  • वजन कमी करण्यासाठी ऋजुता सांगतात की, तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढेच खावे.

  • व्यायामासाठी वेळ नक्की काढा.

  • रोज वेळेत झोपण्याची सवय लावून घ्यावी.

  • जेव्हाही काही खाल किंवा प्याल तेव्हा सेस्टेनिबिलीटीला डोक्यात नक्की ठेवा.

  • आयुष्याचा आनंद घेत जगा. आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत प्रवास आणि काम एंजॉय करा.

कोणत्या चुका टाळाव्या?

  • लोक प्रोजेक्ट हातात घेतल्यासारखे फक्त वजन कमी करायचे यावरच फोकस करतात. ऋजुता दिवेकर म्हणतात फक्त वजन कमी करावे एवढेच लक्ष्य नसावे.

  • शरीराला हा वेटलॉस जर्नी स्वीकारण्यासाठी १२ आठवडे लागतात. त्यामुळे या काळात तुमचे यश किंवा अपयश म्हणून बघू नका.

  • स्वतःला शिक्षा केली आहे असे म्हणून जबरदस्तीचा रामराम करत व्यायाम करू नका.

  • शिवाय काही खाताना आपण अपराध करतोय की, काय अशी भावना ठेवू नका.

  • प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेप, प्रत्येक किलो, कॅलरीचा हिशेब ठेवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Latest Maharashtra News Updates : सत्तास्थापनेनंतर पहिलाच निर्णय 'लाडकी बहिणीं'चे पैसे वाढवणार?

IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानला धक्का; Jasprit Bumrah ने मोडला कपिल देव यांचा विक्रम, ७ मोठे पराक्रम

Eknath Shinde: शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंची मागाठाणेत हॅट्‌ट्रिक, जाणून घ्या विजयाची इनसाइड स्टोरी

Sangli Election Results : पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात? खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यापैकी एकाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT