sadguru sakal
आरोग्य

इनर इंजिनिअरिंग : कामवासनेमध्ये अडकून पडू नका

तुम्ही हे बघता का, की जे लोक काही बौद्धिक कामांमध्ये खोलवर गुंतलेले असतात, त्यांना शारीरिक संबंधांपेक्षा पुस्तक वाचायला जास्त आवडतं?

सद्‍गुरू, ईशा फाऊंडेशन

तुम्ही हे बघता का, की जे लोक काही बौद्धिक कामांमध्ये खोलवर गुंतलेले असतात, त्यांना शारीरिक संबंधांपेक्षा पुस्तक वाचायला जास्त आवडतं?

प्रश्न - माझी तीव्र कामवासना मी कशी घालवू?

सद्‍गुरू - तुम्ही हे बघता का, की जे लोक काही बौद्धिक कामांमध्ये खोलवर गुंतलेले असतात, त्यांना शारीरिक संबंधांपेक्षा पुस्तक वाचायला जास्त आवडतं? हे यामुळे आहे की तुम्हाला जे काही माहिती आहे त्यापेक्षा जास्त सखोल गोष्ट कळली, तर जे कमी महत्त्वाचं आहे ते आपोआपच गळून पडतं. आपण कायमच हा विचार करत असतो की एखाद्या गोष्टीपासून सुटका कशी करून घ्यावी. परंतु कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही जबरदस्तीने सुटका करून घेऊ शकत नाही. तुम्ही कामवासना जबरदस्तीने काढून टाकायचा प्रयत्न केल्यास ती दुसऱ्या कुठल्या मार्गाने वर येईल आणि वेगळ्याच प्रकारची विकृती तुमच्यामध्ये येईल. तुम्ही ते सोडून द्यायचा प्रयत्न केल्यास ते तुमच्या मनावर आणि जाणीवेवर पूर्णपणे राज्य करेल.

माणसं शारीरिक संबंधाच्या मागे धावत आहेत याचं कारण, सध्या त्यांना माहीत असलेला सगळ्यात मोठा आनंद हाच आहे. कोणीतरी त्यांना ते सोडून द्यायला सांगितलं म्हणून ते सोडणार नाहीत. तुम्ही त्यापेक्षाही मोठं काही अनुभवलं तर ते असंच गळून पडेल. म्हणून तुम्हाला फक्त काही आवश्यक गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ गुंतविण्याची गरज आहे, जेणेकरून एक मोठी शक्यता वास्तवात येईल. तुम्ही अशा गोष्टींपर्यंत पोहोचलात ज्या जास्त मोठ्या आहेत, जास्त आनंद देणाऱ्या आहेत, जास्त सुखकारक आहेत, तर हे छोटे आनंद नैसर्गिकपणे गळून पडतील, तुम्ही सोडून दिल्यामुळे नाही, तुम्हाला त्यापेक्षा जास्त मोठं काहीतरी सापडलं आहे म्हणून.

लैंगिकता हा तुमच्या जीवनाचा फक्त एक लहान भाग आहे. लोक शारीरिक गोष्टींबद्दल कमालीचा जास्त विचार करत आहेत याचं कारण म्हणजे नैतिकता आणि शिकवणी, ज्याचं जीवनाशी काही देणंघेणं नाही, जे सांगत असतात ‘तुम्ही शुद्ध असलं पाहिजे. तुम्ही या गोष्टींबद्दल विचार नाही केला पाहिजे.’’ ज्याला तुम्ही पुरुष किंवा स्त्री म्हणता हा फक्त एक लहान शारीरिक फरक आहे, जो काही ठराविक नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बनलेला आहे.

शरीराच्या एका अवयवाला आपण इतकं महत्त्व का दिले आहे? माणसांनी जीवनाकडे ते जसं आहे तसं पाहिलं तर लैंगिकता तिच्या योग्य ठिकाणी राहील. तुमच्या जीवनातील एक छोटी पैलू बनून. प्रत्येक प्राण्यांमध्ये हे असंच आहे.

प्राणी याबद्दल विचार करत नसतात. फक्त माणसंच यात अडकली आहेत. लोकांनी जीवन जसं आहे तसं त्याकडे पाहिलं तर त्यांच्यापैकी बहुतेक लोक फार कमी वेळात यातून बाहेर येतील. बरीच माणसं या गोष्टींमध्ये कधीच न शिरता, त्यांच्या पलीकडे जातात. सध्या सगळं काही विकृत आणि मोठं झालं आहे, ते जीवनाबद्दल योग्य दृष्टिकोन नसल्यामुळे, एवढंच. अन्यथा, तुम्ही बघाल बऱ्याच टक्के लोकांना त्यात रसही असणार नाही आणि असलाच तर तो वरवरचा असेल. सध्या त्याला जेवढं महत्त्व आहे तेवढं असणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT