पायांची जळजळ थांबवा Esakal
आरोग्य

पायांना Burning Sensetion, मग या पानांच्या पाण्याचं सेवन ठरेल उपयुक्त, पोटालाही मिळेल थंडावा

पायांच्या तळव्यांची आग होत असल्यास अनेकजण पायांना शांत वाटावं यासाठी वारंवार पायावर पाणी Water घेतात. मात्र यामुळे केवळ काही मिनिटांसाठी दिलासा मिळतो. यावर तोडगा हवा असल्यास शरीराला आतून थंडावा मिळणं गरजेचं आहे

Kirti Wadkar

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा पायांची प्रचंड जळजळ Burning Sensation होते. काही वेळा पायांची ही जळजळ केवळ उन्हाळ्यातच Summer नव्हे तर वर्षभरात कधीही होवू शकते. यासाठी अनेक कारणं जबारदार असतात. पायांच्या तळव्यांची आग काही वेळेस तर असह्य होते. Save your feet from Burning sensation try these remedies

कमी पाणी पिणं Water Intake, तापलेल्या रस्त्यावर रबरी सोल असलेल्या चपला घालून चालणं किंवा, पायाला पुरेसा रक्तप्रवाह Blood Supply न होणे तसचं रात्रीच्या वेळी पायांमध्ये जास्त रक्तप्रवाह होणे, मधुमेह, अॅलर्जी, हार्मोनल बॅलेन्स बिघडणं अशा अनेक कारणांमुळे पायांच्या तळव्याची आग किंवा जळजळ होते.

पायांच्या तळव्यांची आग होत असल्यास अनेकजण पायांना शांत वाटावं यासाठी वारंवार पायावर पाणी Water घेतात. मात्र यामुळे केवळ काही मिनिटांसाठी दिलासा मिळतो. यावर तोडगा हवा असल्यास शरीराला आतून थंडावा मिळणं गरजेचं आहे. यासाठीच एक घरगुती उपाय केल्यास तुमच्या पायांची जळजळ तर कमी होईलच. शिवाय पोटाला देखील थंडावा मिळेल आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्या दूर होतील. Pudina water benifits

असं तयार करा पुदीना पाणी how to make mint water

पायांच्या तळव्याची जळजळ कमी कऱण्यासाठी पुदीन्याच्या पाण्याचं सेवन करणं हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी पुदीन्याची काही ताजी पानं घेऊन त्याची मिक्सरमधून पेस्ट तयार करा किंवा पुदीन्याची पानं खलबत्याच्या मदतीने तुम्ही वाटून घेऊ सकता. पुदीन्याची ही पेस्ट पाण्यामध्ये मिसळा. त्यानंतर त्यात थोडं काळं मीठ, लिंबू आणि थोडी खडीसाखर टाका.

हे मिश्रण ढवळून काही वेळासाठी तसचं राहू द्या. त्यानंतर तुम्ही ते एका ग्लासमध्ये गाळून त्याचं सेवन करू शकता.

हे देखिल वाचा-

पुदीना पाण्याचे फायदे

तळपायांची जळजळ होईल कमी- पुदीना हे थंड प्रकृतीचं असतं. यामुळे संपूर्ण शरीरालाच थंडावा मिळतो. पायांची जळजळ होत असल्यास नियमितपणे पुदिन्याच्या पाण्याचं सेवन केल्यास पायांच्या तळव्यांची जळजळ कमी होण्यास मदत होईल. mint water benefits

पोटासाठी फायदेशीर - पुदीन्यामधील अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे पोटातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. तसचं यातील थंड गुणांमुळे पोटात थंडावा निर्माण होतो. पुदिन्यातील मेन्थॉलमुळे अॅसिड रिप्लॅक्स कमी होण्यास मदत होते.. तसचं शरीराचं मेटाबोलिज्म म्हणजेच चयापचय क्रिया जलद होवून अन्न पचन चांगलं होतं.

पोटातील गॅस कमी करण्यास उपयुक्त- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पचनासंबधी समस्या निर्माण झाल्याने अनेकदा गॅसचा त्रास होवू शकतो. खास करून उन्हाळ्यात तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने गॅसची समस्या वाढते आणि पित्त देखील होतं. अशावेळी पुदिन्याचं पाणी प्यावं.

या पाण्याच्या सेवनामुळे पोटातील गॅसची समस्या दूर होते आणि अन्न पचण्यास मदत होते. पुदीना पाणी पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करतं.

लघवीला जळजळ होत असल्यास पुदीना फायदेशीर- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास किंवा उन्हाच्या झळांमुळे अनेकदा लघवीला त्रास होतो. लघवी करताना जर जळजळ किंवा वेदना होत असतील तर त्या कमी करण्यासाठी पुदीन्याचं पाणी फायदेशीर ठरू शकतं. यासाठी पुदीनाच्या पाण्याचं दिवसातून एकदा तरी सेवन करावं.

डोकेदुखी होईल दूर- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहाइड्रेशनमुळे तसचं उन्हात जास्त वेळ फिरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो. यासाठी पुदिन्याच्या पाण्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. खास करुन दुपारी बाहेरून घरी आल्यावर किंवा घराबाहेर पडण्याआधी या पाण्याचं सेवन केल्याने फायदा होईल.

पचनशक्ती सुधारण्यास मदत- पुदीन्यामध्ये फायटोन्यूट्रिएन्ट्स आणि अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. उन्हाळ्यात मळमळल्या सारखे वाटत असल्यास पुदीनाच्या पाण्याचं सेवन करावं. किंवा तुम्ही पुदीनाची काही पानं चावून खावू शकता. यामुळेदेखील मळमळ थांबण्यास मदत होईल.

अशा प्रकारे पुदीनाच्या पाण्याच्या सेवनामुळे पायांच्या तळव्यांची जळजळ तर कमी होईलच शिवाय तुमच्या इतर समस्या दूर करण्यासही ते फायदेशीर ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT