heat stroke treatment Esakal
आरोग्य

Summer Care: उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आजच या सवयी लावा

वातावरणातील तापमान वाढत असताना उष्णतेच्या या लाटेचा आपल्या शरीरावर नक्कीच परिणाम होतो. येत्या काळात तापमान अधिक वाढणार असल्याने आपणही आधीच दक्षता घेणं जास्त गरजेचं आहे

Kirti Wadkar

Heat Stroke: भारतातील अनेक राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. महाराष्ट्रातही Maharashtra पारा वाढतोच आहे. शिवाय येत्या काळात तापमान Temprature अधिक वाढण्याची शक्यता आहे.

या वाढत्या उन्हात डिहायड्रेशन आणि त्वचेची जळजळ अशा समस्या तर सामान्य आहेत. अनेक भागांमध्ये तर वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने काहीजणांना प्राण गमवावा लागला आहे. Save Yourself from Heat wave stroke keep yourself hydrate

या जीवघेण्या कडक उन्हात Summer उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या गरमीमुळे अनेकांना शरिरातील पाणी Body Water कमी झाल्याने रक्त दाब कमी होणं, भोवळं येणं तसचं शुद्ध हरपणं अशा समस्यांचाही सामना करावा लागतो. तर उन्हाळ्यात तापमान अधिक वाढल्यास उष्माघातामुळे Heat ताप येऊन आजारी पडण्याची देखील समस्या असते. म्हणूनच काळजी घेणं गरजेचं आहे. 

वातावरणातील तापमान वाढत असताना उष्णतेच्या या लाटेचा Heat Wave आपल्या शरीरावर नक्कीच परिणाम होतो. येत्या काळात तापमान अधिक वाढणार असल्याने आपणही आधीच दक्षता घेणं जास्त गरजेचं आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी कोणत्या सवयी तुम्हाला फायदेशीर ठरतील ते पाहुयात. 

१. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहिल याची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिणं गरजेचं तर आहेच. मात्र हायड्रेशनसाठी पाणी हा एकमेव पर्याय नव्हे. यासाठी तुम्हाला पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणंही गरजेचं आहे.

त्यामुळे काकडी, कलिंगड, टरबूज तसचं मोसंबी द्राक्ष अशी बाजारात उपलब्ध असलेली रसाळ फळ अधिक प्रमाणात खावी. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहण्यासोबतच शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्व मिळण्यास मदत होईल.

फळांमधील साखरेमुळे एनर्जी टिकून राहिल आणि थकवा येणार नाही. म्हणूनच उन्हाळ्यात घराबाहेर पडताना पाण्याच्या बाटलीसोबत एक फळांचा डब्बा नक्की सोबत ठेवा.

२. उन्हाळ्यात गरमीमुळे त्वचेची चमक कमी होते. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी  तुम्ही दिवसातून दोनदा आंघोळ करू शकता. तसचं घराबाहेरून आल्यावर थंड पाण्याने हात पाय धुवा यामुळे शरीराला थंडावा मिळेल. तसचं त्वचेला देखील आराम मिळेल.

हे देखिल वाचा-

३.  जरी तुम्हाला सकाळच्या चहाची किंवा कॉफी पिण्याची सवय असली तरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चहा किंवा कॉफीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. चहा आणि कॉफीतील कॅफेनमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. त्यामुळे तुम्ही ताक किंवा कोकम सरबत  हा पर्याय निवडा.

४. गरज असेल तरच दुपारी घरबाहेर पडा. अन्यथा दुपारी ११- ४ या वेळेत घराबाहेर पडणं टाळा. शक्य ती कामं सकाळच्या वेळेत आटपा.

५. घराबाहेर पडताना सोबत टोपी आणि छत्री घ्यायला विसरू नका. यामुळे डोकं तापणार नाही. अनेकदा डोकं तापल्याने भोवळ येणं किंवा नाकातून रक्त येण्यासारख्या समस्या उद्भवता. या शिवाय जर कमी वेळासाठी बाहेर जात असाल तरी पाण्याची बाटली आणि बॅगमध्ये एखादं चॉकलेट किंवा खडीसाखर ठेवावी. खडीसाखर खाल्ल्याने उष्माघाताच्या त्रासापासून बचाव होतो. 

६. घरात सकाळी १० नंतरच खिडक्या आणि पडदे बंद करावेत. याउलट रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात जेणे करून घर गार राहण्यास मदत होईल. 

७. कैरी पन्हे आणि सत्तू ड्रिंक यांसारख्या पेयांमुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अश शरीरासाठी गार असणाऱ्या पेयांचं जास्तीत जास्त सेवन करा.  

८. थंड ठिकाणाहून अचानक गरमीत किंवा उन्हात बाहेर पडू नका. खास करून एसीमधून जर तुम्ही कडक उन्हात लगेच बाहेर पडलात. तर यामुळे शरीराला बदलत्या तापमानानुसार ऍडस्ट करण्यास वेळ लागतो. यामुळे आजारी पडण्याची किंवा उष्माघाताची शक्यता वाढते. 

९. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना फिके आणि सुती कपडे घाला. शिवाय जर तुम्ही मोटार सायकल किंवा स्कुटीवरून प्रवास करत असाल तर पूर्ण बाह्यांचे आणि फिके कपडे घाला. हेल्मेटचा वापर अवश्य करा. 

हे देखिल वाचा-

१०. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा उन्हात कार पार्क केल्यानेही प्रचंड तापते. गाडीचा पत्रा तापल्याने गाडीच AC लावल्यानंतर गाडी गार होण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे गाडीत बसणं असह्य होतं.

अशा वेळी सावलीच्या ठिकाणी कार पार्क करण्याचा प्रयत्न करा. जर गाडी उन्हात पार्क असेल तर लगेचच गाडीत बसू नका. गाडीची दारं दोन मिनिटांसाठी उघडी ठेवा आणि गाडीचा पंखा सुरू करा. यामुळे गाडीतील गरम वाफ बाहेर जाण्यास मदत होईल. 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आधीच काही सवयी आत्मसात केल्या तर उष्माघातापासून बचाव होणं सहज शक्य आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा दक्षता घेऊन या समस्येपासून कसं दूर राहता येईल यासाठी प्रयत्न करणं हा जास्त योग्य पर्याय आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT