आरोग्य

New Blood Group: ब्रिटनच्या विद्यापीठात नवीन रक्तगटाचा शोध; पन्नास वर्षांपूर्वीचं गुढही उलगडलं

Britain News: काही रुग्णांवर उपचार करताना रक्त बदलावे लागते. त्यापैकी काही जणांवर याचा विपरित परिणाम होतो. अशा लोकांचा हाच दुर्मिळ रक्तगट आहे का, हे या चाचणीच्या आधारे शोधता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

लंडन: ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ (एनएचएसबीटी) आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांना एक नवीन रक्तगट आढळला आहे. या रक्तगटाला त्यांनी ‘माल’ (एमएएल) असे नाव दिले आहे. या शोधामुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ‘एएनडब्लूजे’ या रक्तगट अँटिजेनभोवती निर्माण झालेले गूढही उलगडले असल्याचे संशोधकांनी सांगितले. या नव्या संशोधनामुळे अनेक जणांचे प्राण वाचविण्यात मदत होईल, असा विश्‍वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रयोगासाठी आणि संशोधनासाठी संशोधकांनी वीस वर्षे व्यतीत केली आहेत. लुईस टिली यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले आहे. १९७२ मध्ये ‘एएनडब्लूजे’ या रक्तगटाचा अँटिजेन (लाल रक्तपेशींच्या बाहेर असलेले शरीरातील प्रथिने) सापडल्यानंतरही त्याच्या जनुकीय पार्श्वभूमीचा तपास लागत नव्हता. हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन चाचणी शोधून काढली. प्रत्येकाच्या शरीरात असे अँटिजेन असतात, पण कधी कधी त्यांची संख्या कमी असू शकते. ‘एनएचएसबीटी’ने जनुकीय चाचणीचा आधार घेत रुग्णांमधील हे कमी असलेले अँटिजेन शोधून काढण्याची नवी चाचणी तयार केली.

काही रुग्णांवर उपचार करताना रक्त बदलावे लागते. त्यापैकी काही जणांवर याचा विपरित परिणाम होतो. अशा लोकांचा हाच दुर्मिळ रक्तगट आहे का, हे या चाचणीच्या आधारे शोधता येणार आहे.

हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असला तरी अशा लोकांना आजार झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाणार आहे. जगभरात वर्षाला किमान चारशे लोकांना तरी या नव्या चाचणीमुळे फायदा होईल, असा अंदाज लुईस टिली यांनी व्यक्त केला आहे. चाचणीमुळे नव्या रक्तगटाचे रुग्ण आणि रक्तदाते शोधणे सोपे जाणार आहे. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच चाचणी आहे, शिवाय प्रयोगशाळेने जगभरातील शास्त्रज्ञांना यावर अभ्यास करण्याचे आवाहनही केले आहे. या प्रयोगशाळेने काही देशांमध्ये संदर्भ प्रयोगशाळा उभारल्या आहेत.

संशोधनातील प्रमुख मुद्दे

  • एएनडब्लूजे अँटिजेन : या अँटिजेनची जनुकीय पार्श्वभूमी शोधून काढली.

  • माल रक्तगट : एएनडब्लूजे अँटिजेनचा समावेश असलेला हा नवा रक्तगट

  • एकूण ४७ वा रक्तगट.

  • रुग्णांची सुरक्षा : नव्या चाचणीमुळे ‘एएनडब्लूजे’ नसलेले रुग्ण शोधून काढता येतील आणि उपचारांतील गुंतागुंत कमी करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT