Shubman Gill fitness esakal
आरोग्य

Shubman Gill fitness : स्टार क्रिकेटर शुभमनसारखा स्टॅमिना हवाय? जाणून घ्या त्याचं सीक्रेट

23 वर्षीय क्रिकेटपटूने आपल्या दमदार फलंदाजीने संपूर्ण जगाला चकित केले आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Shubman Gill fitness : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे मॅचमधे किवी (न्यूझीलंड) गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या तीन मॅचच्या सीरीजमधे त्याने एक शतक आणि द्विशतकासह 360 धावा केल्या.

गेल्या अनेक सामन्यांमध्ये शुभमन गिलची अशी काही आकडेवारी समोर आली आहे, ज्यामुळे तो उत्कृष्ट फलंदाज असल्याचे सिद्ध होते. त्याने गेल्या 18 डावात 6 अर्धशतके, 4 शतके आणि एका द्विशतकाच्या मदतीने 1204 धावा केल्या आहेत. या 23 वर्षीय क्रिकेटपटूने आपल्या दमदार फलंदाजीने संपूर्ण जगाला चकित केले आहे. त्याच्या या दमदार स्टॅमिनाचं सीक्रेट काय? ते आज आपण जाणून घेऊया.

जिमिंग

तो नियमितपणे जिमला जातो आणि अधिकतर कठीण वर्कआउट सेशन आणि स्वतःला प्रशिक्षण देताना दिसतो.

व्यायामामध्ये फरक

शुभमन अनेक प्रकारच्या वर्कआउट्सवर लक्ष केंद्रित करतो जसे की डंबेल, चेस्ट प्रेस इ.

दिनक्रम

शुभमन गिल अतिशय कडक दिनचर्या पाळतो. तो म्हणतो की वर्कआउट्स तेव्हाच प्रभावी होऊ शकतं जेव्हा व्यक्ती शिस्तबद्ध असेल आणि योग्य काळजी घेत असेल.

आपले वजन पहा

शुभमन म्हणतो की, अधूनमधून तुमचा आवडता पदार्थ खाणे सामान्य आहे, पण तुमच्या वजनाचीही काळजी घ्या. ख्रिसमसनंतर त्याने एक फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये तो सुट्यांमध्ये वाढलेले वजन कमी करण्यासाठी ट्रेनिंग घेताना दिसत आहे. (Exercise)

सराव

शुभमनचे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे स्वतःचे निश्चित ब्रीदवाक्य आहे. केवळ सराव त्याला त्याच्या आयुष्यात उत्कृष्ट पदावर पोहोचवू शकतो असे त्याचे म्हणणे आहे. (Health News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT