Side Effects Of Chilled Water esakal
आरोग्य

Side Effects Of Chilled Water : उन्हाळ्यात जास्त प्रमाणात थंड पाणी पिताय? मग, जाणून घ्या त्याचे गंभीर दुष्परिणाम

Side Effects Of Chilled Water : सध्या वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला आहे. या वाढत्या उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी अनेक जण थंड पाणी पितात.

Monika Lonkar –Kumbhar

Side Effects Of Chilled Water : सध्या वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला आहे. या वाढत्या उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी अनेक जण थंड पाणी पितात. शरीराला हायड्रेट ठेवणारी पेय पिण्यावर अधिक भर देतो. हे सर्व योग्य असले तरी याचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते.

उन्हाळ्यात खास करून उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक थंडगार पाणी पितात. आपल्यापैकी अनेकांना कडक उन्हातून आल्यावर लगेच फ्रीजमधून बाटली काढून पाणी पिण्याची सवय असेल. हे थंडगार पाणी प्यायल्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि उष्णता दूर होते.

परंतु, थंड पाणी प्यायल्यामुळे, तुम्हाला मिळणारा आराम हा तात्पुरता असतो. परंतु, जर तुम्ही थंडगार पाणी जास्त प्रमाणात पित असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, सतत थंडगार पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या थंडगार पाण्यामुळे तुमचे वजन तर वाढतेच शिवाय, हृदयालाही हानी पोहचू शकते. हे थंडगार पाणी प्यायल्यामुळे आरोग्याचे काय नुकसान होते ? त्याबद्दल जाणून घेऊयात.

डोकेदुखी आणि सायनस

उन्हाळ्यात जर तुम्ही अनेकदा गरजेपेक्षा जास्त कोल्ड्रिंक्स किंवा थंड पाणी प्यायले तर त्यामुळे ब्रेन फ्रीझ ची समस्या उद्भवू शकते. या व्यतिरिक्त जास्त प्रमाणात आईसक्रीम खाल्ल्याने ही असे होऊ शकते. खरं तर थंड पाणी अधिक प्यायल्याने पाठीच्या कण्यामध्ये असलेल्या संवेदनशील नसांना थंड होतात. याचा थेट परिणाम मेंदूवर होते. ज्यामुळे, डोकेदुखी, आणि सायनसचा त्रास होऊ शकतो. (Headaches and sinus)

घशामध्ये वेदना होणे

जास्त प्रमाणात थंडगार पाणी प्यायल्यामुळे घसा खवखवणे, घशामध्ये वेदना होणे इत्यादी समस्या सुरू होतात. खरं तर थंड पाणी प्यायल्यामुळे शरीरात अतिरिक्त श्लेष्मा तयार होतो, जे श्वसनमार्गामध्ये जमा होते. यामुळे, धशामध्ये संक्रमण किंवा संसर्ग होऊन खोकला येऊ शकतो. तसेच, सर्दी ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, उन्हाळ्यात शक्यतो थंड पाणी पिणे टाळावे. (Pain in throat)

पचनाशी संबंधित समस्या

या दिवसांमध्ये थंड पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने याचा आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे, अन्न पचनाची समस्या निर्माण होते. पोट जड होते, पोटात गॅस होणे इत्यादी समस्या होऊ शकतात. मळमळ, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या देखील होऊ शकतात. (Problems related to digestion)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT