Yoga Tips: Sakal
आरोग्य

Yoga Tips: हात आणि पाय दुखीपासून मिळेल आराम, फक्त करा 'या' योगासनांचा सराव

पुजा बोनकिले

Yoga Tips: सध्याची चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोषक घटकांचा अभाव निर्माण होतो. यामुळे अनेक लोकांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. यामुळे अनेक लोकांना हात आणि पाय दुखण्याची समस्या जाणवते. या समस्या कमी करण्यासाठी पुढील योगासनांचा सराव करू शकता.

बालासन

बालासनालाच बाल मुद्रा म्हणतात. हा योग नियमितपणे केल्यास शरीराच्या वेदना कमी होतात. हा योग करण्यासाठी सर्वात आधी वज्रासनात बसावे. नंतर श्वास घेताना आपले दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ करावे. नंतर श्वास सोडा आणि पुढे वाकवा. तळवे आणि डोके जमिनीवर ठेवून दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता तुमच्या दोन्ही हातांची बोटे एकत्र करा आणि हळूवारपणे दोन्ही तळहातांमध्ये डोके ठेवा. काही काळ या स्थितीत रहा आणि नंतर पुर्वस्थितीत यावे.

भुजंगासन

भुजंगासन केल्याने पाय आणि हात दुखणे कमी होऊ शकते. हा योग करण्यासाठी सर्वात आधी पोटावर जमिनीवर झोपावे. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या आणि कंबरेचा वरचा भाग वरच्या बाजूला घ्या. यादरम्यान, कोपर सरळ ठेवा आणि पाय वाकवताना जास्त ताणू नका.

सेतुबंधासन

पाय आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सेतुबंधासन फायदेशीर आहे. हा योग केल्याने पायांच्या स्नायूंमध्ये रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे पायांचे दुखणे बरे होऊ लागते. सेतुबंधासन करण्यासाठी आधी पाठीवर झोपावे. नंतर तुमचे पाय खांद्याच्या रुंदीला वेगळे ठेवा आणि तुमचे गुडघे वाकवा. तळवे उघडा आणि हात जमिनीवर सरळ ठेवा. श्वास घेताना कंबर वर उचलून खांदे व डोके सपाट जमिनीवर ठेवा. नंतर, श्वास सोडताना, पुर्वस्थितीत परत या.

उत्तानासन

उत्तानासन योग केल्याने पाय दुखणे आणि जडपणा या समस्यांपासून आराम मिळतो. हा योग कंबर आणि मणक्यासाठीही फायदेशीर आहे. हा योग करण्यासाठी, सर्वात आधी गुडघे सरळ ठेवा, पाय नितंब-रुंदी वेगळे ठेवा आणि पुढे वाकून पायांच्या मागील भागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT