Sleeplessness Problem esakal
आरोग्य

Sleeplessness Problem : तरुण अन् प्रौढांमध्ये वाढतोय निद्रानाशाचा आजार, अभ्यासातून समोर आलं धक्कादायक वास्तव

मोबाईलच्या अतिवापरामुळे जडतोय आजार

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

Sleeplessness Issue Raising In Youngsters And Elders Study Revealed :

"मला रात्रभर झोप लागत नाही. सारखे वेगवेगळे विचार मनात येतात. दिवसभर सुस्त वाटते. अस्वस्थ वाटते. उत्साहच वाटत नाही", अशी तक्रार घेऊन तिशीतील तरुण मनोविकारतज्ज्ञाकडे आला होता. त्याची कौटुंबिक व कार्यालयीन पार्श्वभूमी डॉक्टरांनी जाणून घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले.

हल्ली कोणाला झोप लागत नाही, काहींची झोप पूर्ण होत नाही, अशा समस्या आहेत. हे निद्रानाशाची लक्षणे असून, सध्याचे धकाधकीचे जीवन, ताणतणाव आणि मोबाईलचा अतिवापर ही त्यामागील कारणे आहेत. निद्रेची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तरुण, मध्यम वयोगटातील रुणांमध्ये प्रमाण जास्त आहे. त्यातही पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

यासाठी किमान आठ तास झोप घेणे, सोशल मीडियाचा अतिवापर टाळणे, यापूर्वी मोबाईलचा वापर टाळावा. घरातील लोकांशी सुसंवाद ठेवने आवश्यक आहे, असा सत्य वैद्यकीय देतात. या बाबत ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. निशिकांत थोरात म्हणाले, "निद्रानाशातून रुग्णांना बाहेर पडण्यासाठी आम्ही समुपदेशन करतो. गरज असेल तर औषधोपचार करतो. महिन्याला किमान १५० रुग्ण येत असतात. "

निद्रानाशाचे परिणाम काय?

  • डोळ्यांखाली सूज येणे

  • चिडचिड होणे

  • सातत्याने डोळ्यांतून पाणी येणे

  • निरुत्साह, अस्वस्थ वाटणे

  • अपूर्ण झोप ही हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते.

मोबाईलचा वाढता वापर हे झोप अपूर्ण होण्यामागचे महत्वाचे कारण आहे. झोपण्यापूर्वी मोबाईलचा जास्त वापर केल्यास थकवा आणि निद्रानाश या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच सोशल मीडियाचा अतिवापरही घातक असल्याचं डॉ. निशिकांत थोरात यांनी सांगितलं.

काय करू नये?

  • रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे टाळावे

  • मोबाईलचा अतिवापर टाळ

  • कॉफी, मद्यपान टाळावे

  • ताण-तणावात राहू नये

काय करावे?

  • झोपेची वेळ निश्चित करा

  • संगीत ऐकावे, वाचन करावे

  • परिसरातील वातावरण शांत असावे

  • व्यायाम योगासने करावीत

शांत झोपेसाठी मंत्र

  • शांत झोप येण्यासाठी ध्यान तसेच मंत्रोच्चार ऐकणे उपयुक्त ठरते.

  • अनेकजण संगीत ऐकत झोपतात.

  • तर 'या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ या मंत्राचा जप करणेही उपयुक्त ठरू शकते.

  • मन शांत झाल्याशिवाय झोप लागत नाही. त्यामुळे ज्याद्वारे आपले मन शांत होते.

  • त्या साधनेचा वापर करणे अधिक सोईचे ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT