How to Get Rid of Spider Webs: घरात स्वच्छता असली की घर कसं प्रसन्न वाटतं. घर स्वच्छ राहण्यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. घराची स्वच्छता करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे जळमटं. घराची फरशी, दारं, खिडक्या स्वच्छ असल्या तरी अनेकदा छतावर आणि भिंतींच्या कोपऱ्यात असलेली जळमटं Cobweb घराची शोभा Home Beauty खराब करतात.
अनेकदा वारंवार साफ करूनही कोळ्यांची ही जळमटं काही पिच्छा सोडतं नाही. काहीही करा, कोळी त्याचं जाळं कोपऱ्यांमध्ये करतातच. Smart Marathi Tips to get rid of Cobwebs in home
कोळी Spider हा देखील दिसायला लहान असला तरी त्याचा डंख अनेकदा वेदनादायी असतो. अनेकदा सूज येऊन जळजळही होते. घरं स्वच्छ Home Cleaning केलं तरी अगदी काही दिवसातच पुन्हा आपल्याला कोळ्याचं जाळं Spider Web दिसून येतं.
कारण कोळी अगदी जलद त्यांचं जाळं तयार करतात. यामुळे कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला तर पुन्हा जळमटं किंवा जाळ्या दिसण्याची चिंता दूर होवू शकते. कोळ्यांच्या जाळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्हाईट विनेगरच्या मदतीने कोळ्यांपासून होईल सुटका
पांढऱ्या विनेगरमध्ये सायट्रिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं. शिवाय त्याचा वासही अत्यंत स्ट्राँग असतो. त्यामुळे विनेगरच्या मदतीने कोळ्यांच्या जाळ्याची समस्या दूर करणं शक्य आहे. व्हाईट विनेगर पाण्यासोबत एका स्प्रे बॉटलमध्ये टाकावं. ज्या ठिकाणी कोळी जाळी तयार करतात त्या ठिकाणी स्प्रे करावा. यामुळे पुन्हा त्या ठिकाणी कोळी जाळं तयार करणार नाही.
पुदीनाच्या पानांच पाणी
पुदीनाच्या पानांच्या वासामुळे स्पायडर पळून जातात. यासीठ एका स्प्रे बॉटलमध्ये पुदीनाच्या पानांचं पाणी तयार करून भरावं किंवा पुदीना तेलही तुम्ही वापरू शकता. या स्प्रेचा घरातील कोपऱ्यांमध्ये वापर केल्यास कोळ्यांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल.
हे देखिल वाचा-
घराबाहेरील लाईट बंद ठेवणे
स्पायडर म्हणजेच कोळी हे बऱ्याचदा इतर छोट्या किटकांना खाण्यासाठी येतात. घराबाहेरील दिव्यावर अनेकदा छोटे किटक आकर्षित होतात. या किटकांनामुळे कोळी देखील घरात येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आवश्यकता नसल्यास घराबाहेरील लाईट बंद ठेवाव्यात.
घराची नियमित स्वच्छता करणं
घर आपण नियमित स्वच्छ करत असलो तरी घरातील काही कोपरे किंवा वस्तूंकडे दूर्लक्ष होतं. सोफ्याखाली किंवा बेडखाली, कपाटामागे एखाद्या मोठ्या शोपिस मागे अनेकदा नियमित सफाई होत नाही परिणामी या ठिकाणी कोळ्यांचं वास्तव्य वाढतं.
लसूणही करेल कोळ्यांपासून सुटका
लसणाचा उग्र वास कोळ्यांना सहन होत नाही. यामुळेच आपल्या स्वयंपाक घरातील लसूण कोळ्यांपासून बचाव करू शकतो. एका लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून ती पेस्ट पाण्यात मिसळावी हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरावं. य़ा स्प्रेचा वापर केल्यास तुम्हाला पुन्हा घरात कोळ्याचं जाळ दिसणार नाही.
तंबाखूचा वापर करून कोळी आणि पाल पळवा
तंबाखूही मानवी आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे तंबाखूचं सेवन करू नये. मात्र हिच तंबाखू तुम्ही घरातील स्पायडर पळवण्यासाठी वापरू शकता. तंबाखूच्या स्ट्राँग वासामुळे घरातील कोळी तर पळतीलच शिवाय घरातील पाल पळवण्यासाठी देखील तंबाखूची मदत होवू शकते.
दालचिनीचा वापर
स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या दालचिनीचा वापर करूनही तुम्ही कोळ्यांच्या जाळ्याची चिंता दूर करू शकता. दालचिनीच्या वासानेही कोळी पुन्हा त्या ठिकाणी फिरकत नाही. यासाठी तुम्ही कोपऱ्यांमध्ये किंवा कोळी असलेल्या ठिकाणी दालचिनीची पावडर टाकू शकता.
लिंबू आणि संत्र्यांची साल-
लिंबू आणि संत्र्यात सायट्रिक ऍसिड आढळतं. घरात जळमट होण्याचं मुख्य कारण हे कोळी असतात. कोळ्यांमुळेच घरात जागोजागी जाळी तयार होतात. या कोळ्यांना उग्र किंवा ऍसिडिक वास सहन होत नाहीत. त्यामुळेच तुम्ही लिंबू किंवा संत्र्याच्या साली ठेवून कोळ्यांना पळवून लावू शकता.
एअर फ्रेशनर
घरात चांगला सुगंध यावा आणि फ्रेश वाटावं यासाठी अनेकजण एअर फ्रेशनरचा उपयोग करतात. अशावेळी जर तुम्ही लिंबू किंवा संत्र्याचा वास असलेल्या एअर फ्रेशनर स्प्रेची निवड केली तर कोळ्यांना पळवणं सोप होईल. कोळी असलेल्या ठिकाणी जर तुम्ही या स्प्रेचा वापर केलात तर कोळी आणि जाळ्यांची समस्या दूर होईल शिवाय घरातही फ्रेश वाटेल.
या उपायांशिवाय तुम्ही निलगिरी तेलाच्या स्प्रेचा देखील वापर करू शकता. यामुळेही कोळ्याचा बंदोबस्त होईल. याशिवाय घरातील भिंती जर खराब झालेल्या असतील. रंग निघालेल्या किंवा सिमेंट निघालेल्या भिंतीवरही कोळी घर करण्याची शक्यता अधिक असते.
यासाठी जर तुम्ही या भिंती दुरुस्त करून घेतल्यात तर कोळ्यांनी जाळ तयार करण्याची शक्यता कमी होते. अशा प्रकारे तुम्ही काही साधे उपाय करून घरातील जळमटांची समस्या दूर करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.