Pranayam Sakal
आरोग्य

प्राणायाम, ध्यानधारणा गरजेची

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मी योग्य आणि माझ्या शरीराला गरजेचा आणि ऋतूनुसार आहार घेते.

अभिनेत्री सोनाली शेवाळे

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मी योग्य आणि माझ्या शरीराला गरजेचा आणि ऋतूनुसार आहार घेते. मी खाण्याच्या वेळा आवर्जून पाळते. उत्तम, पुरेशी आणि शांत झोप घेते. झोपेच्या वेळाही पाळते. रोज रात्री दहाला झोपून सकाळी पाच वाजता उठते म्हणजे सात तास सलग झोप घेते.

मी सकाळी लवकर उठून योगसाधना, अंगमर्दना, सूर्यक्रिया, सूर्यशक्ती, चक्रसाधना, मुद्राभ्यास करते. जे मी सद्‍गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशन या संस्थेतून शिकले आहे.

मला पहिल्यापासून नृत्याची आवड आहे. त्यामुळे मी मुंबईत भरतनाट्यमचे क्लासेसही घेते. त्यातून माझी किमान एक तास नृत्यसाधना होते. शरीर लवचिक व तंदुरुस्त राहण्यासाठी मी भरपूर फिजिकल ॲक्टिव्हिटी करत राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मला तहान भरपूर लागते आणि त्यातून पाणी जास्त प्यायलं जातं. त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

खरंतर मी जीममध्ये जात नाही. मी माझा व्यायाम, योगासनं, प्राणायाम, योगनिद्रा आणि मेडिटेशन घरीच करते. कारण मला माझी साधना पहाटे लवकर करायची असते अन् त्यावेळी शांतता पण खूप लागते. असं प्रसन्न अन् शांत वातावरण घरीच मिळतं.

मी नियमितपणे योगासनं, प्राणायाम वा ध्यानधारणा करते. त्यासाठी मी आठवड्याचं वेळापत्रक ठरवलेलं आहे. त्याचं नियोजन मी काटेकोरपणे पाळते.

मी दररोज सकाळी अकराच्या आधी भिजवलेले ड्रायफ्रूट्स, भिजवलेले शेंगदाणे आणि ऋतूनुसार फळं घेते. दुपारी डाळी, कडधान्यं, पालेभाज्या, फळभाज्या, भाकरी, ताक, सॅलड घेते. संध्याकाळी सहापूर्वी मखाना भेळ, सूप घेते आणि सहानंतर काहीही खात नाही.

सुदृढ आरोग्याबाबत टिप्स

  • योग्य, सात्त्विक, गरजेनुसार आहार घ्यावा.

  • पुरेशी आणि शांत झोप घ्यावी.

  • आपल्या आवडीनुसार आणि नियमितपणे व्यायाम करावा.

  • भरपूर तहान लागावी म्हणून शारीरिक हालचाली कराव्यात, व्यायाम करावा आणि भरपूर पाणी प्यावं.

  • आपल्या आवडीप्रमाणे एखादी कला जोपासावी.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT