Happy Life esakal
आरोग्य

Happy Life : आयुष्यातला गोंधळ वाढतच चाललाय, काय करावं सुचत नाही? मग फॉलो करा या १० टिप्स

आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर प्रत्येक गोष्ट सुटसुटीत आणि सुरळीत असावी.

धनश्री भावसार-बगाडे

Tips For Sorted And Happy Life : सध्याच्या काळात प्रत्येकच माणसाचं आयुष्य हे धावपळीचं आणि व्यस्त झालं आहे. काम जास्त आणि वेळ कमी अशा लाइफस्टाईलमुळे कामांचा गुता आणि ताण दोन्हीही वाढत जातं. अशा आपण शांत आयुष्य जगणं, स्वतःकडे लक्ष देणं विसरून जातो. मग याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य थोडं साधं, सोपं बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी आज आम्ही अशा १० गोष्टी सांगणाऱ आहोत ज्यामुळे तुमचं आयुष्य आनंदी होऊ शकेल.

रुटीन बनवा -

दिवसभराच्या, आठवड्याभराच्या कामांचं एक रुटीन लागलेलं असलं की, ती कामं त्या त्या वेळे योग्य पद्धतीने पुर्ण होतात. त्यामुळे कामांच रुटीन लावून नियमितता असायला हवी. जर कामांचं रुटीन नसेल तर तुम्हाला जीवन अस्ताव्यस्त वाटतं. कोणत्याही कामाची वेळ ठरलेली नसली की ताण येतो. जेव्हा तुमचं रुटीन सेट होतं तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात.

प्राधान्य कशाला द्यायचं ते ठरवा

पहिलेतर एक गोष्ट समजून घ्यायला हवी की, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवता येत नाही. त्यामुळे प्रत्येकच गोष्टीच्या मागे धावणं बंद करायला हवं. सगळ्यात पहिले तुम्हाला त्या गोष्टींची लिस्ट बनवायला हवी ज्या जीवनात अचिव्ह करणं आवश्यक आहेत. थोडक्यात कशाला प्राध्यान्य द्यायचं हे ठरवून त्याची लिस्ट बनवायला हवी. मग त्यानुसार काम करायला सुरुवात करायला हवी. त्यामुळे तुम्हालाच तुमचं आयुष्य सॉर्टेड वाटेल.

Happy Life

पर्याय कमी करा

सोपं आयुष्य जगण्यासाठी सगळ्यात आवश्यक असतं की, रोजच्या आयुष्यातले पर्याय कमी करा. जेव्हा माणसाकडे बरेच पर्याय असतात तेव्हा तो कंफ्युज असतो. त्यामुळे जे काम लवकर होणार असतं त्यालाही वेळ लागतो. त्यामुळे हे निवडावं की, ते या कंफ्यूज स्टेटमधून बाहेर पडायला हवं. कुठे थांबायचं हे ओळखायला हवं.

नाही म्हणायला शिका

सोपं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला नाही म्हणता यायला हवं. फक्त दुसऱ्यांनाच नाही तर स्वतःलाही नाही म्हणता यायला हवं. दुसऱ्यांच्या किंवा स्वतःच्या अपेक्षांचं अतिरिक्त ओझ घेऊन जगणं ताण वाढवणारंच असतं. त्यामुळे कुठे थांबायचं, नाही म्हणायचं हे ओळखलं तर आयुष्य सोपं होतं.

Happy Life

अॅडजस्टमेंट करता यायला हवी

जर तुम्हाला साधं आयुष्य जगायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, आयुष्यात सतत बदल होत असतात. कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याची लवचिकता तुमच्यात असायला हवी. बरेचसे लोक बदल स्वीकारु शकत नाहीत त्यामुळे त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या आयुष्यात गोंधळ वाढतच जातो.

ज्यात आवड आहे ते करा

एवढ्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं कठीण होऊ शकतं, पण अशक्य नसतं. रोज स्वतःसाठी थोडा वेळ काढायलाच हवा. यावेळात तुम्ही तेच करा जे तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक वाटतं. जेव्हा तुम्ही असं करू लागाल तेव्हा तुम्ही खूश रहाल. आनंदी राहील्याने आयुष्य सॉर्टेड होतं.

Happy Life

वर्तमानात जगा

तुम्ही हे अनेकदा ऐकलं असेल की, आपण वर्तमानात जगायला हवं. कारण जेव्हा आपण वर्तमानात जगतो तेव्हाच आनंदी राहू शकतो. बहुतांश लोक आपल्या भूतकाळामुळे दुःखी असतात तर इतर भविष्याची चिंता करत असतात. यामुळे ते वर्तमानात जगू शकत नाही. यामुळे आयुष्यात गुंतागुंतच वाढते.

शक्यतो मल्टीटास्कींग टाळावे

बऱ्याच लोकांना असं वाटतं की, एकाच वेळी अनेक कामं करून आपण वेळ वाचवू शकू. पण तसं नसतं. एकाच वेळी अनेक कामं केल्याने एकावरही पूर्ण लक्ष देता येत नाही. त्यामुळे कामं बिघडतात. चुका तुमच्या आयुष्याचा गोंधळ अजून वाढवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT