धने खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते. भारतीय स्वयंपाकघरामध्ये सर्वसाधरणपणे कोथिंबरी किंवा धने वापरले जाते. कोथिींबरी किंवा धन्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे. इतकेच नव्हे तर डाएटिशिअन्स धन्याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात आणि ते पाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे. एक टीस्पून धने, एक कप पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या. चला तर मग जाणून घेऊ या धन्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत
धन्याचे पाणी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओळखली जाते कारण त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात.
धने व्हिटॅमिन के, सी आणि ए सारख्या जीवनसत्त्वांनी समृद्ध असल्याचे ओळखले जाते. त्याच वेळी, केस मजबूत आणि जलद वाढणे आवश्यक आहे. सकाळी धन्याचे पाणी प्यायल्याने तुमचे केस गळणे आणि तुटणे कमी होऊ शकते. तुम्ही धन्याचे तेल किंवा हेअर मास्क म्हणूनही लावू शकता.
धने/ कोथिंबिरीमध्ये काही पचनक्षमता वाढविणारे गुणधर्म असतात. सकाळी धन्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय गतिमान होते. हे तुम्हाला तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकते.
धने/ कोथिंबिरीमध्ये भरपूर लोह असते. त्यात अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत. सकाळी धने/ कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार आणि मुलायम राहते.
संशोधनानुसार, जर तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर तुम्ही धन्याच्या पाण्याचे सेवन करू शकता.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही धन्याचे पाणी पिऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.