Blood Sugar Control  esakal
आरोग्य

Blood Sugar Control : साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टींपासून राहा दूर, महिन्याभरात दिसून येईल फरक

Monika Lonkar –Kumbhar

Blood Sugar Control : मागील काही वर्षांपासून देशात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे तरूणाईमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. पूर्वी मधुमेहाची लागण ही ४५ ते ५० च्या वयानंतरच मधुमेह होत असे. परंतु, सध्याच्या काळात कमी वयातच लोक मधुमेहाला बळी पडत आहेत.

सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, जंकफूडचे वाढलेले सेवन ही त्याची प्रमुख कारणे आहेत. परंतु, या व्यतिरिक्त इतर अनेक कारणे आहेत. ज्यामुळे, शरीरातील मधुमेहाची पातळी वाढू शकते.

साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर, आहार आणि सवयी सुधारा. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्यापासून दूर राहिल्यास मधुमेहाच्या रूग्णांना फायदा होऊ शकतो आणि साखरेवर नियंत्रण मिळवता येईल. चला तर मग जाणून घेऊयात मधुमेहामध्ये कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात?

उशिरा जेवणाची सवय

अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. जर तुम्हाला ही अशी सवय असेल तर तर वेळीचा ही सवय सोडा. रात्री उशिरा जेवण केल्यामुळे आपल्या पोटातील अन्न नीट पचले जात नाही. यामुळे, अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या या सवयीमुळे हृदयविकाराचा झटका, मधुमेह इत्यादी आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, संध्याकाळी ७ च्या आधी जेवण करण्याचा प्रयत्न करा.

जेवण केल्यानंतर लगेच झोपणे

जर तुमच्या शरीरात साखरेची पातळी जास्त असेल तर तुमच्या जीवनशैलीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जेवण केल्यावर लगेच झोपलात तर, शरीरातील कफ दोष वाढतो. याचा परिणाम साखरेच्या पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे, जेवण केल्यावर २-३ तासांनंतरच झोपण्याचा प्रयत्न करा.

साखर अन् मैद्यापासून राहा दूर

मधुमेहाच्या रूग्णांनी साखर, मैदा, ग्लुटेनयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहावे. या गोष्टींचा आहारात समावेश केल्याने मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. कारण, या सर्व गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे, साखरेची पातळी वाढू शकते.

वेळेवर औषधे न घेणे

मधुमेहाची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष देण्यासोबतच औषधांकडे ही नीट लक्ष द्या. कारण, दिनचर्येसोबतच तुम्ही वेळेवर औषधे घेणे देखील महत्वाचे आहे. वेळेवर औषधे घेण्यासोबतच इतर घरगुती उपाय देखील करत राहा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT