Stomach Cancer sakal
आरोग्य

Stomach Cancer : जठराचा कर्करोग; चोर पावलांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. सुमीत शहा

अन्ननलिकेचा पुढील भाग म्हणजे जठर. आपण खाल्लेल्या अन्नपचनाची सुरवात येथून होते. या महत्त्वाच्या अवयवालाच कर्करोग झाला तर...? हा जठराचा कर्करोग म्हणजेच पोटाचा कर्करोग यालाच ‘गॅस्ट्रिक कॅन्सर'' म्हणतात.

हा आजार आधी मुख्यत्वे पाश्चिमात्य देशांमध्ये जास्त होता, परंतु आता भारतातही याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जठराच्या कर्करोगाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अधिकांशवेळा लक्षणाशिवाय हा वाढलेला दिसून येतो. त्याची सुरवात हळूहळू होते. सुरवातीला त्याची काहीच लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्याचे निदान उशिराने होते. त्याचे निदान होते त्या वेळी तो दुसऱ्या टप्प्यापर्यंत गेलेला असतो. मग प्रश्न असा पडतो की, हा ओळखायचा कसा?

आम्लपित्त, पुनःपुन्हा ढेकर येणे, ॲसिडिटी, पोटदुखी, भूक कमी लागणे ही सर्वसाधारणपणे पोटाच्या अल्सरची लक्षणे आहेत आणि हीच जठराच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. काळजाकडे जळजळ होऊ लागली, अकारण वजन घडलं, थोडसं खाल्लं तरी पोट भरल्यासारख वाटू लागला.

ॲनिमिया आहे, बेचैनी अस्वस्थता वाढतेय, मळमळ, उलट्या होऊ लागल्या व उलटीमध्ये रक्त आढळले, शौचामधून काळ्या रंगाचे रक्त पडत असेल. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कारण या सर्व लक्षणांचा हळूहळू वाढत जाणारा प्रवास हा जठराच्या कर्करोगाच्या मुक्कामी जाऊन थांबतो.

कोणाला होण्याची अधिक शक्यता..

  • ‘स्मोक फूड'', मांसाहारी, उच्च प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन.

  • मसालेदार, अतितेलकट, अतितिखट पदार्थांचे सततचे सेवन.

  • धूम्रपान, तंबाखू, दारुचे अतिसेवन.

  • ‘बॅक्टेरिया एच पायोलरी‘ या जंतूच्या दीर्घ संसर्गाने, पोटाला सूज आल्यामुळे.

  • आनुवंशिक कारणांमुळे.

कसा टाळता येईल?

  • दररोज व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा.

  • जेवणामध्ये कोथिंबीर, फळभाज्या, पालेभाज्या, तंतुमय पदार्थ, कच्चे सॅलड याचा आवर्जून वापर करावा.

  • प्रथिनेयुक्त आहार असावा.

  • दूषित पाणी, दूषित अन्न टाळावे.

  • मिठाचा वापर कामी करावा.

  • आहारामध्ये फळांचा समावेश असावा, पाणी भरपूर प्यावे.

  • डॉक्टरांच्या असल्याशिवाय औषधोपचार टाळावा.

  • नेहमीच वेदनाशामक औषधे टाळावे.

  • नियमित वैद्यकीय तपासणी करावी

निदान व टप्पे

आजाराचे निदानासाठी एंडोस्कोपचे म्हणजेच तोंडातून दुर्बीण टाकून जठराची तपासणी व बायोप्सी काढून त्याची तपासणी करणे हे महत्त्वाचे ठरते. आजार कुठल्या टप्प्यामध्ये आहे हे पाहण्यासाठी सिटी स्कॅन, पेट-सिटी स्कॅन अशा वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात.

उपचार

आजार नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहे त्या प्रमाणे उपचाराची दिशा निश्चित होते. पोटातील गाठ किती मोठी आहे किती खोलवर गेलेली आहे? तसेच हा आजार इतर अवयवांना पसरला आहे का? यावर उपचारांची दिशा ठरते.

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केले जाते. तिसऱ्या टप्प्यामध्ये शक्यतो केमोथेरपी देऊन गाठ कमी केली जाते आणि नंतर शस्त्रक्रिया केली जाते. चौथ्या टप्प्यात केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपीचा वापर केले जातो. आवश्यकतेनुसार सर्जरी, केमोथेरपी, रेडिएशन, टार्गेटेड ड्रग थेरपीचा वापर केला जातो. मात्र हा उपचार तज्ज्ञांकडून केल्यास यशाची शक्‍यता वाढते हे मात्र नक्की.

(लेखक प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कर्करोगतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: राज्यात नेमकं चाललंय काय? वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; एकाला अटक, दुसरा फरार

Latest Maharashtra News Updates : राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा; भाजप नेत्याच्या याचिकेवर आज सुनावणी

PAK vs ENG 1st Test : ‘Root’ मजबूत! इंग्लंडच्या जो रूटने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; टॉफ फाईव्हमध्ये एकही भारतीय नाही

Jalebi History: भारतात जिलेबी आली कशी अन् नाव कसे पडले? राहुल गांधींच्या वक्तव्यावरून चर्चेत आलेल्या जिलेबीचा इतिहास काय?

Thane Politics: ठाण्यात भाजपमध्ये होणार बदल? इच्छुकांची मांदियाळी, भूमिपुत्रांना संधी देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT