Stomach Gas Relief Esakal
आरोग्य

Stomach Gas Relief : घरगूती उपायांनी पोटातील गॅसची समस्या होणार छुमंतर!

घरगुती उपायही या समस्येवर आहेत फायदेशीर

सकाळ डिजिटल टीम

बाहेरील आरबट चरबट पदार्थ खाल्याने जिभेचे चोचले पुरवले जातात. पण, पोटाला मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो. बराचवेळा भरपूर मसाले आणि तेलकट पदार्थ पोटात गेल्याने गॅस होणे, पोटात दुखणे अशा समस्या उद्भवतात. त्यामूळे अचानक अशा परिस्थितीत काय करावं समजत नाही?.

पोटात जळजळ व्हायला लागली की लोक पित्तावरच्या गोळ्या खातात. पण, सतत औषधे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरेल.  त्यामूळे भविष्यात कधी तूम्हाला असा त्रास जाणवायला लागला की, त्यावर काय घरगूती उपाय करता येतील ते पाहुयात.

मेथीचे दाणे

आपल्या आरोग्यासाठी जशी मेथीची पालेभाजी उपयुक्त ठरते. तसे पोटाच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे चांगले असतात. फक्त एक चमचा मेथीदाणे रात्री भिजत ठेवा आणि नंतर सकाळी खा. यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होईल.

गरम पाणी

डॉक्टर तूम्हाला गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे काहीही खाल्ल्यानंतर गरम पाण्याचे सेवन करणे फायद्याचे असते. यामुळे तुम्हाला गॅस होत नाही. गरम पाणी प्यायल्याने अन्न चांगले पचते आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

फुटाणे

वेळ जात नाही म्हणून अनेक लोक फुटाणे चघळत बसतात. फुटाण्यांचाही पोटाच्या समस्येत फायदा होतो. त्याच्या सेवनाने गॅस बाहेर पडतो आणि पोट हलके होते. फुटाणे खाल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. याशिवाय वजन कमी करण्यासही मदत होते.

आवळ्याचा रस

आवळा पोटासाठीही चांगला आहे. त्याचा मूळ गुणधर्म आंबट असल्याने तो जास्त आवडीने खाल्ला जात नाही. पण, रोज त्याचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात. त्याचा रस रोज प्यायल्याने डोळे, केस, त्वचा आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

ओवा किंवा जिरे खाणे

जर तुम्हाला फक्त गरम पाणी प्यायला त्रास होत असेल तर तुम्ही 1 चमचा ओवा किंवा जिरे पाण्यात उकळेपर्यंत गरम करा. पाणी पुरेसे गरम झाल्यावर ते पाणी गाळून थंड होण्यासाठी वेगळ्या भांड्यात ठेवा. त्यानंतर ते पाणी दिवसातून २ वेळा प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT