School Bag Weight sakal
आरोग्य

आरोग्यमंत्र : शाळेचे दप्तर व पाठीचा कणा

शालेय मुला-मुलींचे दप्तर आजकाल फार जड असते. एका दिवसात शालेय मुले सुमारे ६ ते ८ वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात.

प्रशांत पाटील

- डॉ. अजय कोठारी | डॉ. सिंपल कोठारी

शालेय मुला-मुलींचे दप्तर आजकाल फार जड असते. एका दिवसात शालेय मुले सुमारे ६ ते ८ वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात. त्यामुळे या मुलांना किमान ८ भिन्न शालेय पुस्तके बाळगावी लागतात. यामध्ये वह्या, वर्कशीट्स आणि इतर आवश्यक वस्तूही असतात. त्याशिवाय जेवणाचा डबा व पाण्याची बाटली, छत्री किंवा रेनकोट या वस्तूही न्याव्या लागतात. जड दप्तर वाहून नेण्याच्या परिणामामुळे अनेकदा मुलांना पाठदुखीचा अनुभव येतो. यावर उपाययोजना न केल्यास स्कोलियोसिस (वक्रता), मानदुखी, कायफोसि (कुबड), खांदेदुखी किंवा पाठीचे इतर आजार होऊ शकतात.

दप्तराचे किती वजन असावे ?

साधारणपणे आपले जेवढे वजन आहे त्याच्या १० ते १५ टक्के दप्तराचे वजन मुले पेलू शकतात. म्हणजे ३० ते ४० किलो वयोगटातील मुलांना ३ ते ४ किलोपेक्षा जास्त वजन नसावे, अन्यथा पाठदुखी सुरू होण्याची शक्यता असते. या समस्येकडे पालकांनी व शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे व त्यास पर्याय शोधला पाहिजे. यासाठी पुढील बदल फायदेशीर ठरतील.

१) रोज वेगवेगळे विषयांचे तास न ठेवता एक किंवा दोनच विषयांचे २-३ तास ठेवावेत.

२) कधीतरी लागणाऱ्या पुस्तकांसाठी कपाटाची व्यवस्था.

३) वह्या व पुस्तके लहान आकाराची असावीत. प्रत्येक परिक्षेत्रानुसार त्याचे नियोजन करावे.

४) पाण्याची लहान बाटली ठेवावी व शाळेत शुद्ध पाण्याची सोय करावी.

५) शाळेत निरोगी आहाराची सोय असावी.

६) गृहपाठ, परिक्षेत्रासाठी एकच वही असावी.

७) जड शालेय साहित्यांची खेरदी टाळावी.

८) खांद्याला चांगला आधार असलेले योग्य दप्तर निवडा.

९) अधिकचे साहित्य द्यायचे असल्यास वेगळ्या पिशवीत द्यावे.

१०) दप्तराच्या पट्ट्या घट्ट करा, त्यामुळे भार संतुलित होईल.

११) पाठदुखीविषयी लहान मुले विचारल्याशिवाय सांगणार नाही. त्यासंबंधी त्यांना विचार.

१२) पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास दुखापत होऊ शकते हे मुलांना समजावून सांगा. पाठीत वक्रता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

१३) मुलांना पाठीच्या व खांद्याच्या स्नायूंच्या बळकटीसाठी व्यायाम करायला सांगा, त्यांना कॅल्शिअम व ‘व्हिटॅमिन डी’युक्त आहार द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT