Stomach gas Problem Esakal
आरोग्य

Stomach Pain: गॅसमुळे पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतोय? काय आहेत इतर कारणं?

Kirti Wadkar

Stumoch Pain problem: पोटामध्ये गॅस होणं ही तशी तर एक साधारण समस्या आहे. मात्र अनेकदा ही साधारण समस्यादेखील अत्यंत त्रासदायक ठरू शकते. अनेकदा पोटात गॅस झाल्याने भयंकर वेदना होतात. अनेकदा ही पोटदुखी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराचंही लक्षण असू शकते. Stumoch Pain due to gases check carefully

जर तुम्हाला वारंवार पोटदुखी Stomach Pain होत असले किंवा तुम्हाला पोटदुखीचं कारणं ठाऊक असेल तर त्यावर वेळीच उपयाचार Treament करणं शक्य असतं.

जर तुम्हाला सतत गॅसचा Gases त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात काही इतर समस्या निर्माण झाल्याची शक्यता असू शकते ज्यामुळे तुम्हाला गॅसचा त्रास सहन करावा लागतो. 

अनेकदा चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खाल्ल्याने गॅसची समस्या निर्माण होते. काहीवेळेला ही समस्या काही घरगुती उपचार किंवा काही साध्या औषधोपचारामुळे दूर होते.

मात्र अनेकदा ही समस्या वारंवार होत राहते. सतत गॅसची समस्या निर्माण झाल्याने त्यावर उपचार करणंही अनेकदा कठिण जातं. यासाठी इतर कारणंही असू शकतात. म्हणूनच या समस्येचं मुळ शोधणं गरजेचं ठरतं. 

आतड्यांची समस्या- आतड्यांची समस्याही अनेकदा छोट्या किंवा मोठ्या आतड्याममध्ये आढळून येते. अनेकदा आतड्यांमध्ये सूज निर्माण होते. क्रोहन डिजीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटीस यांसारख्या समस्यांमध्ये आतड्यांना सूज येते.

यामुळे फिजिकल ब्लॉकेज, मांसपेशिंमध्ये वेदना असा त्रास जाणवू शकतो. शिवाय यात पचनसंस्थेच्या माध्यमातून कॅन्सर किंवा इतर समस्याही उद्भवू शकतात. 

हे देखिल वाचा-

कुणाला होवू शकतो हा त्रास

डॉक्टरांच्या मते प्रत्येकाला एकदा तरी आतड्यांचा आजार होतो. काहींना तर विषबाधादेखील होते.यासाठी अनेकदा व्हायरल तसचं बुरशीयुक्त आणि नासलेल्या अन्न पदार्थांचं सेवन जबाबदार असतं.

काही लोकांना क्रोहन डिजीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस, सीलिएक रोग म्हणजेच ग्लूटन एलर्जी किंवा कोनल कॅन्सर म्हणजे आतड्यांच्या कर्करोगामुळेदेखील पोटात भयंकर वेदना येऊ शकतात. 

काही वेळा पोटाची सर्जरीमुळे देखील आतड्यांमध्ये समस्या निर्माण होवू शकते. याशिवाय जर एखादी व्यक्ती दीर्घ काळासाठी ओपियेट्स सारख्या औषधांचं सेवन करत असेल तर आतड्यांमध्ये पॅरालिसिस सारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. तसचं अनेकदा मधुमेहामध्ये देखील आतड्यांवर परिणाम होत असतो. 

आतड्यांच्या समस्येचं निवारणं (Improve Gut Health)

वेळीच खबरदारी बाळगल्यास आतड्यांच्या या समस्या कमी करणं शक्य आहे. यासाठी तुम्ही दररोज किमान २५ ते ३० ग्रॅम फायबरचं सेवन करत आहात याची खात्री करावी. आहारात योग्य प्रमाणात फायबरचं सेवन केल्यास पचनसंस्था सुरळीत चालते. यामुळे तुमच्या आतड्याचं कार्य देखील चांगलं होईल. 

तसचं यासाठी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखणं गरजेचं आहे. कमीत कमी अँटीबायोटिक औषधांचं सेवन करा. कारण अँटीबायोटिक औषधांच्या अतिसेवनाने आतड्यांमध्ये गंभीर इंफेक्शन होण्याची शक्यता असते. तर तुमच्या कुटुंबात कुणालाही कोलन कॅन्सर झाला असेल तर किमान वय ४५ होण्यापूर्वीच कोलन कॅन्सरची तपासणी करा.

हे देखिल वाचा-

आतड्यांच्या समस्यांचा परिणाम

  • तज्ञांच्या मते आतड्यांच्या समस्येचा रोजच्या दिनचर्येवर किंवा आरोग्यावर परिणाम होवू शकतो. आतड्यांच्या समस्यांमुळे किंवा त्याच्या लक्षणामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रासाचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होवू शकतो. 

  • याचा परिणाम तुमच्या आहारावरही होवू शकतो. जसं की तुम्ही काय खात आहात, किती खात आहात आणि तुम्ही जे खात आहात त्यातील पोषक तत्व शरीर किती पचवतंय यावर परिणाम होवू शकतो. 

  • यामुळे आतड्याममध्ये सूज येऊ शकते. तुमच्या डायजेशन ट्यूब या गॅस आणि घाणीने भरून जातात त्यामुळे पोटात सूज येते. 

  • जर आतड्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाला तर तुम्हाला खाण्यासोबतच पाणी देखील पचणार नाही. यामुळे तुम्हाला उलटी येऊ शकते. 

यामुळेच पोटाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला साधी सुधी वाटणारी पोटदुखी गंभीर आजारासाठी देखील कारणीभूत ठरू शकते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency landing at Nagpur: बांगलादेश ते ओमान जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग, मोठं कारण आलं समोर

Rahul Gandhi Rally In Maharashtra: राहुल गांधींचे मिशन महाराष्ट्र! विधानसभेसाठी घेणार 20 सभा, कोण असणार टार्गेट?

Share Market Today: शेअर बाजाराच्या घसरणीत खरेदी करावी का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Ganesh Idol Controversy : गणेशमूर्तीच्या वेशभूषेवरुन मोठा वाद, का झाले गणेशभक्त आक्रमक? नेमकं प्रकरण काय?

Davis Cup : भारताची टेनिस संघाची पराभवाची मालिका कायम; स्वीडनचा ४-० ने शानदार विजय

SCROLL FOR NEXT