Diabetes Patient Health Care: मधुमेहाच्या रूग्णांना काय खावे काय नाही याबाबत कायम टेंशन असतं. त्यामुळे इच्छा असतानाही बऱ्याच गोष्टी मधुमेहाचे रूग्ण खाऊ शकत नाही. मात्र अशा रूग्णांसाठी ही माहिती खुशखबर ठरणार आहे. तुमच्या बॉडीचं शुगर लेव्हल तुमच्या खाण्याच्या सवयींवर फार निर्भर असतं. तेव्हा कोणती फळे तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहेत ते जाणून घेऊया.
संत्रे - संत्र्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 40 असला तरी मधुमेहाच्या रूग्णांसाठी हे फळ सुरक्षित मानलं जातं. याशिवाय हा विटामिन सी चा मुख्य स्त्रोत आहे. बॉडीला संक्रमित होण्यापासून हे फळ वाचवतं. तसेच हड्ड्यांना आणि रक्तवाहिन्यांना स्वस्थ ठेवण्यास मदत करते. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं.
चेरी - या फळात भरपूर प्रमाणात पोषक तत्व आणि ग्लायसेमिक इंडेक्स असतो. या फळाने शुगर लेव्हल वाढण्याचा धोका अजिबात नसतो. शिवाय यात पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. तुमची इम्युन सिस्टिम त्यामुळे बूस्ट होते.
स्ट्रॉबेरी - मधुमेहाच्या रूग्णांसाठी स्ट्रॉबेरी फार उपयुक्त असते. कारण इतर फळांच्या तुलनेत यात साखरेची मात्रा कमी असते. तसेच यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. यात संत्र्याच्या तुलनेत अधिक विटामिन सी ची मात्रा असते.
सफरचंद - हे फळ देखील मधुमेहाच्या रूग्णांसाठी चांगलं असतं. याने ब्लड शुगरवर नकारात्मक प्रभाव अजिबात पडत नाही. त्यामुळे मधुमेहाचे रूग्णदेखील हे फळ खाऊ शकतात.
पेर - पेरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्याने तुमचे वजनही कंट्रोल मध्ये असते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी हे फळ फार चांगलं मानलं जातं. (Pear Fruit)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.