Suhana sakal swasthyam Sanskrit pronounciation helps for healthy life Sanskrit language expert Sakal
आरोग्य

Suhana Sakal Swasthyam 2023 : संस्कृत उच्चारणातून निरोगी जीवन!

भारतीय योग, तत्त्वज्ञान, ज्ञानपरंपरा, संस्कृती अशा विविध विषयांमध्ये त्यांनी नावीन्यपूर्ण योगदान दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Suhana Sakal Swasthyam 2023 : आपण बोलतो त्या वेळी आपल्या जिभेचा तोंडातल्या विविध ठिकाणी स्पर्श होतो. ती स्थाने चक्रांशी जोडलेली आहेत. संस्कृत वर्णमालेत हा विचार फार सूक्ष्मपणे करण्यात आला आहे. इंग्रजीच्या वर्णमालेसारखी ती ‘रॅन्डम’ नाहीत.

त्यामुळं संस्कृतमधील उच्चारांचा संपूर्ण शरीरावर आणि पर्यायानं भवतालावरही परिणाम होतो. हा परिणाम नेमका कसा होतो, संस्कृतच्या अध्ययनानं काय साध्य केलं जाऊ शकतं, त्याचा दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल यावर मी ‘स्वास्थम्’मधील माझ्या व्याख्यानात विवेचन करणार आहे.

- डॉ. अनुराधा चौधरी, संस्कृत भाषातज्ज्ञ

संस्कृतचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी अविरत प्रयत्नशील असलेल्या डॉ. अनुराधा चौधरी आयआयटी खरगपूर येथे संस्कृतचं अध्यापन करत असून, केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाचा भाग असलेल्या ‘इंडियन नॉलेज सिस्टिम’साठी त्या समन्वयक म्हणूनही काम पाहतात.

भारतीय योग, तत्त्वज्ञान, ज्ञानपरंपरा, संस्कृती अशा विविध विषयांमध्ये त्यांनी नावीन्यपूर्ण योगदान दिले आहे. संस्कृतचा दैनंदिन जीवनात वापर करण्यासाठी ‘संस्कृत योग’ कसा आचरावा याची मांडणी त्या ‘सकाळ स्वास्थम्’च्या व्यासपीठावर करणार आहेत.

वर्णमालेच्या अचूक उच्चाराचा शरीरावर कसा परिणाम होतो?

संस्कृत वर्णमाला व त्यावर आधारित इतर भारतीय भाषा यांचा उच्चारशास्त्रात फार सखोल विचार केला गेला आहे. कंठ्य ते ओष्ठ्य अशा विविध प्रकारच्या वर्णांनी युक्त असलेल्या संस्कृत वर्णमालेच्या उच्चारानं जिभेचा ज्या ज्या ठिकाणी स्पर्श होतो, तेथील चक्रे संचलित होतात. त्यांची स्थाने निश्‍चित आहेत व त्याचा थेट संबंध मस्तिष्काशी आहे.

उच्चार अचूक झाल्यास मस्तिष्काचं संचलनही व्यवस्थित होतं आणि याचा थेट परिणाम शरीरावर होतो. ही सर्व प्रक्रिया आपोआप होत असते. इतर भाषांमध्ये असा विचार झाल्याचं फार दिसत नाही. जसं की, फ्रेंच भाषेत ‘मूर्धन्य’ (ट, ठ, ड, ढ, ण, र, ष, ळ, ऋ) वर्णच नाहीत. त्यामुळं संस्कृतचं महत्त्व आपण समजून घ्यायला हवं. बौद्ध तत्त्वज्ञानात असं म्हटलं आहे, की रोज संस्कृत वर्णमालेचा अचूक उच्चार करणाऱ्या व्यक्तीला व्याधी जडत नाहीत.

‘इंडियन नॉलेज सिस्टिम’शी आपण जोडलेल्या आहात. गेल्या काही वर्षांत पुन्हा एकदा प्रादेशिक भाषांकडचा ओढा वाढताना दिसतो आहे. तुम्ही या बदलाकडं कसं पाहता?

प्रत्येक भाषेचं एक वेगळं सौंदर्य आहे. प्रत्येक भाषा एका जीवनदृष्टीशी जोडली गेली आहे. संस्कृत भाषेला मोठी ज्ञानपरंपरा आहे. त्यामुळं भारतीय संस्कृतीचा विचार केल्यास संस्कृतला वगळून चालणार नाही.

प्रत्येक भाषेत विशिष्ट पारिभाषिक शब्द असतात आणि ते इतर कोणत्याही भाषेत नसतात. त्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या भाषेत समजून घेऊ शकतो. मात्र, ती भाषा मुळातूनच अभ्यासली, तर त्याचा मूळ संदर्भ समजतो. त्यामुळं भारतीय संस्कृती, शास्त्र, अध्ययनपद्धती हे सर्व जाणून घ्यायचं असल्यास संस्कृत यायला हवं. या भाषेतून मिळणारं ज्ञान आणि त्यातून होणारा आविष्कार याचं महत्त्व आता सर्वांना समजू लागल्यानं लोकांची जिज्ञासा वाढते आहे.

आजच्या तंत्रयुगात संस्कृत शिकून काय मिळेल, असा प्रश्‍न विचारणाऱ्या तरुणांची संख्या खूप जास्त आहे. तुम्ही काय सांगाल?

मी आयआयटीमध्ये शिकवते तेव्हाही मला बऱ्याचदा हा प्रश्‍न विचारला जातो. मी त्यांना सांगते, की ‘रिटर्न’च्या अपेक्षेनं ‘इन्व्हेस्टमेंट’ करणं यात गैर काहीच नाही. मात्र, त्यासाठी तुम्ही संस्कृत आधी नीट जाणून घ्या. जसं की, कोणत्याही कॉम्प्युटर प्रोग्रामसाठी कोडिंग करावं लागतं. तुम्हाला उत्तम ‘कोडर’ व्हायचं असल्यास संस्कृतशी मैत्री करा.

कोडिंगमध्ये प्रत्येक गोष्टीमागं एक विशिष्ट विचार असतो आणि त्यामुळंच अपेक्षित परिणाम दिसतो, तसं संस्कृतमध्येही आहे. त्यामुळं तुम्हाला ‘लॉजिकल’ विचार करायची सवय लागते. दुसरं म्हणजे, बुद्धी, विचारक्षमता तीव्र करण्याचं काम संस्कृत करते.

‘संस्करण’ करण्याचं काम ‘संस्कृत’ भाषा करते. संस्कृतचं व्याकरण ज्याला कळलं, त्याला इतर भाषांचं व्याकरण समजणं अवघड जात नाही. अनेक थोर शास्‍त्रज्ञ संस्कृतचं अध्ययन करतात. विष्णूसहस्रनामाचं नियमित अध्ययन करणाऱ्या काही शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या काळात येणाऱ्या डेटाचं ॲनॅलिसिस करून ‘टूल किट’ तयार केलं होतं.

तुमचे आगामी प्रकल्प कोणते आहेत?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ९ ते १३ डिसेंबर या काळात ‘भारतीय ज्ञानउत्सव’ घेण्यात येणार आहे. त्यात देशभरातील अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक असे सुमारे ६०० ते ७०० लोक सहभागी होणार आहेत. यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

मी ‘स्वास्थ्यम्’च्या प्रेक्षकांशी ‘संस्कृत योग ः टूल फॉर सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन’ या विषयावर संवाद साधणार आहे. हा विषय सर्वांनी समजून घेणं आवश्‍यक आहे, कारण आपल्या मनातील भाव प्रकट करण्याचं एक साधन म्हणून आपण भाषेकडं पाहतो.

मात्र, भाषेचा केवळ तेवढाच उपयोग नाही. ‘भाषाशास्त्र’ समजून घेताना ‘भाषाविज्ञाना’कडं दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण बोलतो त्या वेळी आपल्या जिभेचा तोंडातल्या विविध ठिकाणी स्पर्श होतो. ती स्थाने चक्रांशी जोडलेली आहेत.

संस्कृत वर्णमालेत हा विचार फार सूक्ष्मपणे करण्यात आला आहे. इंग्रजीच्या वर्णमालेसारखी ती ‘रॅन्डम’ नाहीत. त्यामुळं या उच्चारांचा संपूर्ण शरीरावर आणि पर्यायानं भवतालावरही परिणाम होतो. हा परिणाम नेमका कसा होतो, संस्कृतच्या अध्ययनानं काय साध्य केलं जाऊ शकतं, त्याचा दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल यावर मी विवेचन करणार आहे.

प्रत्येक भाषेचं एक वेगळं सौंदर्य आहे. प्रत्येक भाषा एका जीवनदृष्टीशी जोडली गेली आहे. संस्कृतला मोठी ज्ञानपरंपरा आहे. आपण भारतीय संस्कृतीचा विचार केला, तर संस्कृतला वगळून चालणार नाही. अनेक थोर शास्‍त्रज्ञसुद्धा संस्कृतचं अध्ययन करतात. आजही विविध देशांतील अभ्यासक संस्कृतचं अध्ययन करतात आणि नंतर आपलंच ज्ञान आपल्यालाच समजून सांगतात. मग आपणच अभ्यास का करू नये?

- डॉ. अनुराधा चौधरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT