डिहायड्रेशनची काळजी Esakal
आरोग्य

Health Tips : Dehydration पासून स्वतःला ठेवा दूर...

How to Stay Hydrated : उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहिल याची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी Water पिणं गरजेचं असतं. मात्र उन्हाळ्यात Summer होणारं हे डिहायड्रेशन एका दिवसात होत नाही. तर हळू हळू ही स्थिती निर्माण होत असते

Kirti Wadkar

Dehydration Prevention Tips : उन्हाळ्यात वाढत्या उन्हामुळे, शरीरातून सतत जाणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता वाढते. यालाच आपण डिहायड्रेशन Dehydration म्हणतो. वाढत्या गरमीमुळे अनेकांना शरिरातील पाणी कमी झाल्याने रक्तदाब Blood Pressure कमी होणं, भोवळं येणं तसचं शुद्ध हरपणं अशा समस्यांचाही सामना करावा लागतो. तर उन्हाळ्यात तापमान Temperature अधिक वाढल्यास डिहायड्रेशनमुळे ताप येऊन आजारी पडण्याचीही शक्यता असते. Summer Tips Marathi Know Symptoms leading to dehydration

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहिल याची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी Water पिणं गरजेचं असतं. मात्र उन्हाळ्यात Summer होणारं हे डिहायड्रेशन एका दिवसात होत नाही. तर हळू हळू ही स्थिती निर्माण होत असते. डिहायड्रेशनचे दुष्परिणाम दिसण्याआधी किंवा त्याचा शरीरावर परिणाम होण्यापूर्वी आपलं शरीर काही संकेत देत असतं. Symptoms of dehydration

शरीरात पाण्याची पातळी कमी होताच अनेक बदल दिसू लागतात. जसं की थकवा जाणवणं, चक्कर येणं असे काही बदल दिसू लागता. या बदलांआधी देखील शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. हे संकेत किंवा लक्षण आपण आधीच ओळखले तर डिहायड्रेशनचा धोका टाळता येणं शक्य आहे. Dehydration signs and symptoms. 

ओठ कोरडे पडणं- उन्हाळ्यात अनेकदा ओठ सारखे कोरडे होत असतात. मात्र आपण याकडे बऱ्याचदा दूर्लक्ष करतो. मात्र ओठ कोरडे पडणं हे डिहायड्रेशनचं पहिलं लक्षण आहे. तसचं काहीवेळा शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास ओळ काळे देखील पडू लागतात. Dry Lips 

पाण्याच्या कमतरतेमुळे ओळ सुकतात आणि काही वेळा त्यांना सूज येते आणि ते काळे पडू लागता. अशा वेळी ओठांना केवळ लिप बाम लावणं हा पर्याय नाही. तर शरीर आतून हायड्रेट असणं गरजेचं आहे. 

लघवीचा रंग बदलणं- उन्हाळ्यात लघवीचा रंग बदलणं म्हणजेच जर तुम्हाला पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर याचा अर्थ तुम्ही कमी पाणी पित आहात. डिहाड्रेशनमुळे कमी प्रमाणात लघवीला येते. तिचा रंग पिवळा असंतो. अनेकदा लघवीला जळजळ देखील होते. डिहायड्रेशनचं हे एक प्राथमिक लक्षण आहे. लघवीला पिवळी होवू लागल्यास पाणी पिण्याचं प्रमाण वाढवढं गरजेचं आहे. 

हे देखिल वाचा-

मळमळणे- शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास सतत मळमळण्याचा त्रास जाणवतो. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील मेटाबोलिक रेट बिघडतो. यामुळेच तुम्हाला सतत मळमळू शकतं. तसचं पाण्याच्या कमतरतेमुळे योग्य पचन होत नाही. यामुळे पोट फुगत आणि मळमळ वाढते.

त्वचा कोरडी होणं- शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्वचा कोरडी होते. त्वचेवर रॅश आणि खाज येते. अशावेळी तुमची नाजुक त्वचा अचानक ताणल्यासारखी वाटू शकते. 

तोंडाची दुर्गंधी- डिहायड्रेशनमुळे तोंडांतून दुर्गंधी येऊ लागते. घसा कोरडा पडतो. तसचं कोरडेपणामुळे तोंडांत पुरेशी लाळ तयार होत नाही. यामुळे तोंडात मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया वाढतात. परिणामी तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. 

थकवा आणि डोकेदुखी- शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास थकवा जाणवतो. थोडंस काम करण्यासही पुरेशी ऊर्जा नसते. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकदा रक्तदाब कमी होतो. यामुळे थकवा, मरगळ तसचं ग्लानी .येणं आणि डोकेदुखीची समस्या भेडसावते. 

ही काही डिहायड्रेशनची लक्षण आहेत. यासोबत सतत तहान लागणं आणि भूक देखील लागते. डिहायड्रेशनची ही लक्षण लक्षात घेऊन त्वरित काही प्राथमिक उपाय केल्यास मोठा धोका टाळणं शक्य आहे. हायड्रेट राहण्यासाठी केवळ जास्त पाणी पिणं हा एकमेव पर्याय नाही. तर उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी पाण्यासोबत जास्त पाण्याचं प्रमाण असलेल्या फळांचं सेवन करणं गरजेचं आहे. dehydration signs and symptoms

उन्हाळ्यात कलिंगड, टरबूज, संत्री तसचं सिझनल आंबा आणि द्राक्षं यासाख्या फळांचं सेवन करावं . तसचं आहारात पालेभाज्या आणि दुधी, दोडका असं पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहून पुरेशी पोषक तत्व मिळाल्याने तुम्ही फिट राहाल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT