Fridge Cold Water Side Effects Esakal
आरोग्य

Fridge Water Side Effects: फ्रिजमधलं थंड पाणी प्यायल्याने Heart Rate कमी होण्यासोबत या गंभीर समस्या उद्भवतील

आयुर्वेदात गार पाणी आरोग्यासाठी Health नुकसानदायक असल्याचं म्हंटलं आहे. खास करून फ्रिजमधील थंडगार पाणी कायम टाळावं. उन्हातून घरी परतल्यावर किंवा एक्सरसाइज तसंच

Kirti Wadkar

Fridge Water Side Effects: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराबाहेर अंगाची लाही लाही होत असताना कधी एकदा गार पाण्याचे दोन घेतोय असं  अनेकांना वाटतं. गरमीच्या Summer दिवसांमध्ये गार पाणी प्यायलं की मनाला समाधान मिळतं.

घशाची कोरड मिटवण्यासाठी आणि तहान भागवण्यासोबतच हायड्रेट राहण्यासाठी उन्हाळ्यात अनेकजण थंड पाण्यासोबत ताक, लस्सी, लिंबू सरबत किंवा इतर कोल्ड ड्रिंक्स पिणं पसंत करतात. Summer Tips read before drinking cold water in heat

तज्ञांच्या सल्ल्यानुसार हायड्रेट राहण्यासाठी दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणं Water गरजेचं आहे. मात्र पाणी पिण्यासोबतच तुम्ही कोणत्या तापमानाचं Temprature पाणी पिताय हे देखील अत्यंत गरजेचं आहे. 

उन्हाळ्यात Summer तहान भागवण्यासाठी फ्रिजमधील पाणी आपल्यापैकी अनेकजण पितात. यामुळे शरीराला तात्पुरता थंडावा मिळत असला तरी भविष्यात हे गार पाणी पिण्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

आयुर्वेदात गार पाणी आरोग्यासाठी Health नुकसानदायक असल्याचं म्हंटलं आहे. खास करून फ्रिजमधील थंडगार पाणी कायम टाळावं.

उन्हातून घरी परतल्यावर किंवा एक्सरसाइज तसंच जेवणानंतर गार पाणी Cold Water प्यायल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होवू शकतो. जर तुम्ही देखील चुकीच्या वेळी फ्रिजमधील गार पाणी पित असाल तर यामुळे आरोग्याचं होणारं नुकसान आधी जाणून घ्या.

१. पचनसंस्थेवर परिणाम- जेवल्यानंतर किंवा एखाद्या पदार्थाचं सेवन केल्यानंतर शरीर त्या पदार्थाला शरीराच्या तापमानवर घेऊन येतं त्यानंतर ते पचनासाठी पुढे जात. एकून खाल्लेल्या पदार्थाचं तापमान पोटाच्या तापमानाच्या लेवलला आधी आणलं जातं.

मात्र फार कमी तापमान असलेले म्हणजेच थंड पदार्थ खाल्ल्याने शरीर ते त्याच्या तापमानाबरोबर आणण्यासाठी प्रयत्न करू लागतं. यामुळे पचन क्रिया मंदावते आणि अपचनाची समस्या निर्माण होते. पोटात थंड पाणी गेल्याने अपचनाचा त्रास होतो. एका संशोधनानुसार थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळेही पचनाची समस्या निर्माण होते.

२. घसा खवखवणे- थंड पाणी प्यायल्याने त्याचा घशावरही परिणाम होते. गार पाण्यामुळे घसा दुखणे तसचं घसा खवखवण्याची समस्या निर्माण होते. तसचं जेवल्यानंतर लगेचच थंड पाणी प्यायल्यास श्लेम म्हणजेच कफ तयार होतो. परिणामी श्वासोच्छवासाचा मार्ग बंद होतो. त्यामुळे घसा खवखवणे, कफ, सर्दी आणि घशाला सूज येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हे देखिल वाचा-

३. हार्ट रेटवर परिणाम- थंड पाण्याच्या सेवनामुळे तुमच्या हृदयाचे ठोके कमी होवू शकतात. एका अभ्यासानुसार फ्रिजमधलं थंड पाणी जास्त प्यायल्याने दहावी क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) स्टिम्युलेट म्हणजेच उत्तेजित होते. थंड पाण्याता परिणाम थेट या नर्व्हवर होत असल्याने त्याचा परिणाम हार्ट रेटवर होतो.

४. डोकेदुखी- उन्हातून आल्यानंतर जर लगेचच खूप थंड किंवा बर्फाचं पाणी प्यायल्याने मेंदू फ्रिज होण्याची शक्यता असते. थंड पाणी प्यायल्याने तुमच्या मणक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी सुरु होवू शकते. सायनसचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या समस्या यामुळे आणखी वाढू शकतात. त्यामुळेत सायनसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे.

५. वजन कमी करण्यात अडचण- जे लोक वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी थंड पाण्याचं सेवन टाळावं. थंड पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट्स बर्न होण्यास अडचण निर्माण होते. फ्रिजमधील पाण्याने शरीरातील चरबी अधिकच कडक होवू लागते त्यामुळे ही चरबी वितरण्यास अडचणी निर्माण होवून वजन कमी होत नाही.

६. बद्धकोष्ठता- बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी थंड पाणी पिणं टाळावं. अन्यथा हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही जेवताना गार पाणी पिता तेव्हा ते जेवण थंड आणि अधिक कडक होवू शकतं. तसंच आतड्यांचंही आकुंचन होतं आणि हे बद्धकोष्ठतेचं एक महत्वाचं कारणं आहे. त्यामुळे जास्त गार किंवा जास्त गरम पाणी पिणं टाळावं.

७. एनर्जी कमी होणं- थंड पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म हळू होतं त्यामुळे शरीराची जास्त कार्य करण्याची उर्जा कमी होते. शरीरातील फॅट बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाल्याने शरीर सुस्त होतं आणि एनर्जी लेवल कमी होते. 

यासाठीच उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड गार पाणी पिण्याचा मोह टाळा. उन्हाळ्यात अनेकदा नळाला गरम पाणी येतं किंवा भांड्यातील पाणी देखील कोमट लागतं. त्यामुळे असं पाणी पिण्याची इच्छा होत नाही आणि पाणी कमी प्यायलं जातं. यासाठी तुम्ही काही ट्रीक्स वापरू शकता. 

हे देखिल वाचा-

- पाणी एखाद्या स्टील किंवा तांब्याच्या टाकीत अथवा भांड्यात भरा. या भांड्याला बाहेरून एखाद जाड ओलं केलेलं कापड गुंडाळा. हे कापड वाळलं की वरचेवरच पाणी शिंपडून ओलं ठेवा. यामुळे भांड्यातील पाणी पिण्यासाठी पुरेसं गार होईलं. असं पाणी प्यायल्याने कोणताही त्रास होणार नाही.

- जर तुम्ही बाटलीमध्ये पाणी भरत असाल तर तुम्ही बाटलीला देखील एखादा ओला रुमाल गुंडाळून ठेवू शकता. प्रवासातही तुम्ही बाटलीला ओला रुमाल किंवा नॅपकिन गुंडाळून ही बाटली एखाद्या पिशवीत ठेवली. तर पाणी चांगलं गार राहिलं. 

- यासोबतच फ्रिजच्या पाण्याला पर्याय म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही मातीच्या भांड्याचा म्हणजेच माठाचा वापर करू शकता. माठातील गार पाणी प्यायल्याने शरीराला कोणताही त्रास होत नाही. 

अशा प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उन्हाळ्यात फ्रिजमधील गार पाणी पिणे बंद करणे गरजेचं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT